गुप्त समेवर - भाग १
माधवगड बंगला, एका उच्चभ्रू सोसायटी मध्ये दिमाखात उभा डॉ. माधव नेनेंचा बंगला. धड्डाम्...बंगल्याच्या मागच्या बाजूस आवाज आला. रिया भिंतीवरून उडी मारून बंगल्याच्या आवारात शिरली. आपण हे करतोय ते योग्य आहे की नाही या गोंधळात भिंतीवरच थांबलेल्या मुग्धाला तिने दबक्या आवाजात ओरडले, “ मिनू, जास्त विचार करू नको. आपल्या मिशन साठी आजसारखी संधि परत मिळणार नाही आपल्याला. कम ऑन डियर, जंप.” गोंधळ दूर सारून मुग्धाने पण उडी मारली अन दोघी मांजरीच्या पावलाने बंगल्याच्या दारासमोर आल्या. आता पुढील काम आणखी कठीण होते. त्यांनी आणलेल्या डुप्लिकेट चावीने जर दाराचे लॉक उघडले नाही तर इतक्या दिवसांची बंगल्यात शिरण्यासाठी केलेली मेहनत पाण्यात जाणार होती. “मनू, लवकर दे चावी, वॉचमन पानटपरीवरून येईल दोन मिनिटात. त्याआधी आपण आत जायला हव नाही तर आपली खैर नाही.” “हे घे.” चाव्यांचा जुडगा रियाकडे देत मुग्धा म्हणाली. “ ओह शीट यार... तिन्ही चाव्या लागल्या नाहीत. आता लास्ट ट्राय करते. त्या की मेकऱने काही घोळ तर...