द मिस्टरी वुमन
सत्य घटनेवर आधारित कथा (सदर कथा वाचकांनी स्वत:च्या जबाबदारीवर वाचावी. तुमच्या मनावर होणार्या परिणामांसाठी लेखक जबाबदार नाही!) सकाळपासून कोसळणार्या श्रावणसरींमुळे वातावरणात एक सुखद गारवा होता. आज प्रोजेक्ट प्रेझेंटेशन बॉसला दाखवून झाल्यावर लॅपटॉप स्विच ऑफ करताना बॉसच्या लॅपटॉप वरील स्क्रीनसेवर वरती त्याची नजर खिळली , Women. They Are A Complete Mystery! हे वाक्य होत त्या स्क्रीनवर. काही तरीच काय? ते वाचून सुजय ला हसू आल आणि लगेचच मृणाल चा निरागस चेहरा त्याच्या डोळ्यासमोर तरळला. तिचा विचार करतच त्याने बॅग पॅक केली आणि ऑफिस मधून बाहेर पडून, गाडी काढून निघाला. इतके दिवस प्रोजेक्ट वेळेत पूर्ण करायच्या प्रेशरमुळे नव्या नवरीकडे , मृणालकडे दुर्लक्ष करून त्याला ऑफिस मध्ये मान मोडेस्तोवर काम कराव लागायच! त्यामुळे लग्नानंतरचा पहिलावहिला रोमॅंटिक पावसाळा अजून त्याने अनुभवलाच नव्हता. आज प्रोजेक्ट पूर्ण झाल्यावर मात्र त्याला मृणालची तीव्र आठवण झाली. छोट्या गावातून आली असल्याने या मोठ्या शहरात तिला रूळण जरा जड जात होत , शिवाय त्याचे आईवडील पण गावीच त्यामुळे...