Posts

Showing posts from October, 2021

कुत्र चावल तर...

 आपण मोठे स्वतःला शहाणं समजून लहान मुलांना काही शिकवायला जावं आणि मुलांच्या डोकेबाज पणापुढे निष्प्रभ व्हावं!!! दिसायला इतकुसे असले तरी यांची डोकी खूप भारी आणि विचार एकदम स्पष्ट आणि पक्के असतात. आता म्हणाल, मधूनच अस काय झालं आणि मला ही उपरती झाली. तीच  धमाल सांगायला हा लेखनप्रपंच! हि घटना आहे प्राचीन काळातील म्हणजे कोरोनारूपी राक्षसाच्या आगमनापूर्वीची! जेव्हा सर्व काही सुरळीत चालू होत, घरातील छोटे शैतान खऱ्याखुऱ्या शाळेत जाऊन माझ्या सारख्या बिचाऱ्या आयांना  काही तास मनःशांती द्यायचे. गेले ते दिवस, राहिल्या त्या आठवणी... आता ऑनलाईन शाळेने पालकांची जी काही वाट लावली आहे, असो!( तो एक वेगळाच किस्सा आहे, परत  कधी तरी सविस्तर लिहीन!)  त्याच असं झालं, माझी  कन्याश्री ( जस मातोश्री , पिताश्री यानुसार तिने स्वता:ला कन्याश्री ही पदवी बहाल केली आहे.😃 बरोब्बर ओळखलंत, मागील लॉकडाउन मधील रामायणाचे परिणाम!!) म्हणजे स्पृहा नुकतीच शाळेत जाऊ लागली होती. शाळेत जाणार म्हणून एक आठवडा आधी पोरीने जोमाने सगळी खरेदी केली, त्यापूर्वी आम्ही जवळपास सहा महिने ८-१० शाळा पालथ्या घाल...