Posts

Showing posts from July, 2020

गुप्त समेवर - भाग १४

Image
वसुंधरा मॅम दिल्लीहून परत आल्या तरी मुग्धाशी त्यांची भेट किंवा बोलणं झालच नाही . बर्‍याचदा फोन करून पण एकदाही त्या मुग्धाशी बोलल्या नाहीत. हल्ली कॉलेजमध्ये पण फार क्वचित दिसायच्या . वसुंधरा मॅम सध्या  सेमिनार , यूनिवर्सिटी मिटींग , नॅशनल कॉन्फरन्स अश्या अनेक गोष्टींमध्ये व्यस्त असल्याच तिला कॉलेज मध्ये इतर स्टाफ कडून समजायच. तिने एकदा आर्यनला फोन करून मॅमला भेटता येईल का ते विचारले होते , पण त्याने तो सध्या डॅडसोबत ऑफिस मध्ये बिझी असून मॅम त्यालाच एक आठवडा भेटल्या नसल्याच सांगितलं. असही आर्यन आणि वसुंधरा मॅमच विशेष बॉंडिंग नाहीये हे मुग्धाला समजत होत. मुग्धाला कधी एकदा मॅमला भेटून त्या ब्रेसलेट मधील कोड्याच उत्तर सांगत्ये आणि त्याचा तिच्या भूतकाळाशी असलेला संबंध त्यांना विचारते आस झाल होत. तिच्या भूतकाळाविषयी वसुंधरा मॅमना सगळी माहिती असावी अशी तिची अटकळ होती.       आज मात्र नियतीने स्वत:हून मुग्धा आणि वसुंधराची भेट घालायचं ठरवलं होत. वसुंधरा नेने पीजी स्टुडन्ट चे प्रोजेक्ट सब्जेक्ट अप्रूव्ह करणार होत्या , रोल नंबरनुसार दिलेल्या टाइम स्लॉट मध्ये एक...

गुप्त समेवर - भाग १३

Image
      वसुंधराला थांबवण्यासाठी मुग्धा कॉफीशॉप बाहेर आली तोपर्यंत उशीर झाला होता , ड्रायवरने आणलेल्या कार मध्ये बसून वसुंधरा निघाली होती. मॅम दिल्लीला जाण्याच्या घाईत असल्याने   आता कॉल करून पण काही उपयोग होणार नाही , त्या परत आल्यावर प्रत्यक्ष भेटून बोलावं अस ठरवून मुग्धा गाडी काढून सरळ तिच्या फ्लॅटकडे निघाली. गाडी चालवत असताना पूर्णवेळ वसुंधराच एकेक वाक्य तिच्या डोक्यात घुमत होत. ‘ अगदी तीच सवय... आईवर गेली आहेस तू! ’ वसुंधरा मॅम आणि यशोदाची एकदाही गाठ पडली नाही , शिवाय यशोदा नेहमी वेणी घालत असल्याने तिला अशी केस कानामागे सारायची सवय पण नव्हती! मग नक्की कुणाबद्दल बोलत होत्या मॅम ?... ओह गोड! त्यांना माझ्या जन्मदात्या आईची माहिती आहे ? शारदाश्रम पण माहितीये त्यांना... ‘ ते ब्रेसलेट म्हणजे एका रहस्याकडे नेणारा दुवा आहे ’ नक्की काय रहस्य आहे त्या ब्रेसलेटमध्ये ?... मला ते शोधवच लागेल! विचारांचा नुसता गुंता झाला होता मुग्धाच्या डोक्यात. मुग्धा फ्लॅटवर आली तेव्हा रीया पण कॉलेजहून परत आली होती. मुग्धाला पाहून तिला चिडवण्याच्या सुरात रीया म्हणाली , “काय म...

गुप्त समेवर - भाग १२

Image
“एक्सक्यूज मी नेने मॅडम ?” मागून कुणीतरी आवाज दिल्याने वसुंधरा कॉलेज कॅंटीनच्या बाहेर अडखळली , तिने मागे वळून पाहिले. आसिस्टंट प्रो.लिमये धापा टाकत समोर वसुंधराच्या समोर आला , “सॉरी मॅडम , हे दिल्लीच्या सेमिनार साठी लागणारे पेपर तुम्ही तातडीने मला सबमिट करायला संगितले होते , करेक्शन करून मी तुम्हाला द्यायला तुमच्या केबिन मध्ये गेलो तर प्यूनकडून कळलं तुम्ही इकडे आलात सो...”   “ओके… पाहते मी.”       वसुंधराने लीमयेंकडून ती फाइल घेतली. वसुंधरा प्रो.लिमयेशी बोलत असतानाच कॅंटीन मधून बाहेर पडलेली मुग्धा तिच्यामागून गेली . वसुंधरा कॅंटीनमध्ये जाईपर्यंत मुग्धा गाडी काढून कॉलेज कॅम्पस बाहेर पडली होती. वसुंधराने कॅंटीन मध्ये पाऊल टाकताच आत्तापर्यंत तिथे सुरू असणारा गोंधळ एकदम शांत झाला. तिला सगळीकडे पाहिल , तिथे कुठेच मुग्धा नव्हती पण रीया मात्र दिसली. वसुंधरा मॅडम आपल्याकडेच येत असल्याच पाहून रीया आणि तिच्या मैत्रिणी ताडकन उभ्या राहिल्या. त्यांना बसायला सांगून वसुंधराने मुग्धाची चौकशी केली . ती आत्ताच कॅंटीन बाहेर पडली अस समजल्यावर वसुंधराने रीयाकडून ...

गुप्त समेवर - भाग ११

Image
“पाहिल्याच दिवशी शास्त्री सरांनी काय सॉलिड लेक्चर दिल यार! यावर्षी जरा टेंशन कमी असेल अस वाटलं होत , पण या प्रोजेक्ट पायी आपली वाट लागणार आहे.” समोसा तोंडात टाकत रीया म्हणाली. “हो न यार! मी तर सुट्ट्या फुल्ल एंजॉय केल्या , प्रोजेक्ट साठी काहीच रिसर्च केला नाही. आता एका महिन्यात आपण कस काय रिसर्च करून प्रोजेक्ट डिसाइड करणार ? ”       रेहाने रीयाची रि ओढली. आज सुट्ट्या संपून कॉलेज पुन्हा रिओपन झाल , एक लेक्चर करून मुग्धा तिच्या ग्रुपसोबत कॅंटीनमध्ये बसली होती. मुग्धाला सध्या या सगळ्या गप्पांमध्ये अजिबात इंटरेस्ट नव्हता , तीच लक्ष मोबाइल मध्ये होत. गेल्या महिन्यापासून ती आर्यनच्या रीप्लायची वाट पहात होती. त्यादिवशी ब्रेसलेट हरवल्याच लक्षात आल्यावर मुग्धाने आणि रीयाने अख्खा फ्लॅट पिंजून काढला होता. शोधाशोध सुरू असताना आर्यनचा फोन आल्यावर तो पुन्हा फ्लर्ट करतोय अस समजून आधीच वैतागलेल्या मुग्धाने त्याच बोलणं न ऐकताच त्याला झापून फोन कट केला होता. त्यावेळी तिला कसही करून फक्त ते ब्रेसलेट शोधायच होत. ती आणि रीया हॉटेल मध्ये पण जाऊन आल्या. पण ते ब्रेसलेट काही स...

गुप्त समेवर - भाग १०

Image
खूप दिवसांच्या प्रयत्नांनि मुग्धाच्या हाती तिच्या भूतकाळातील एक वस्तु मिळणार होती. कधी एकदा शारदाश्रम मध्ये जाऊन संगीता ताईना भेटतेय आणि ती वस्तु घेतेय अस झाल्याने घाईघाईत मुग्धा तिचा मोबाइल घरीच ठेऊन आली होती. तिथे संचालकांच्या  केबिनमध्ये संगीता ताई मुग्धाची वाट पहात होत्या . मुग्धाला समोरच्या खुर्चीवर बसायला सांगून त्यांनी बाजूच्या कपाटातून एक छोटासा बॉक्स काढून तो मुग्धासमोर टेबलवर ठेवला आणि म्हणाल्या , “हे घे तुझी अमानत! तू येऊन गेल्यावर मी तुझ्याविषयीच्या सगळ्या जुन्या फाइल चेक केल्या , त्यावेळी मला या वस्तूची नोंद एका ठिकाणी दिसली. तुला दवाखान्यात आणल होत तेव्हा तुझ्या हातात एक ब्रेसलेट होत जे तुझ्यावर उपचार सुरू असताना नर्सने बाजूला काढून ठेवलं पण तेव्हा ते गहाळ झाल. तुला दत्तक घेऊन साठे मुंबईला शिफ्ट झाल्यावर काही दिवसानी ती नर्स शारदाश्रमला आली आणि तिने ते ब्रेसलेट इथे जमा केल होत. त्यावेळी ते तुझ्यापर्यंत पोचवायच राहून गेल . त्याची नोंद दिसल्यावर शारदाश्रमच्या स्टोररूम मधून ते शोधून काढलं.” तो बॉक्स हातात घेत मुग्धा म्हणाली , “थॅंक यू सो मच ताई! तुम्ही वेळ का...

गुप्त समेवर - भाग ९

Image
        अविनाश मुग्धाच्या फ्लॅट मधून बाहेर पडला आणि तो सोसायटी पार्किंग मधील त्याच्या गाडीत बसून सीट बेल्ट बांधत असताना शेजारी एक कार पार्क झाली. त्यातून उतरलेल्या वसुंधरा नेनेला पाहून अविनाशच्या चेहर्‍याचा रंग उडाला. वसुंधरा नेने इथे येण्याचं कारण शोधण्यासाठी अविनाशने गाडी बंद केली आणि तो लपून त्यांचा पाठलाग करू लागला.  वसुंधरा स्वराला म्हणाली, “फ्लॅट नंबर काय आहे मुग्धाचा?” “थर्ड फ्लोर, फ्लॅट नंबर 305”    मोबाइल मध्ये अड्रेस पहात स्वराने संगितले. त्या दोघींना लिफ्ट मध्ये जाताजाता मुग्धाविषयी बोलत असल्याच  अविनाशने ऐकलं आणि त्या इथे मुग्धाकडेच आल्या असल्याची त्याची खात्री पटली. मुग्धा तिच्या भूतकाळाचा शोध घेत असताना वसुंधराने तिला भेटणं अविनाशला रुचल नाही. त्या दोघींना लांब ठेवावं अस ठरवून तो परत त्याच्या गाडीकडे निघाला आणि वसुंधरा स्वरासोबत दारात उभी पाहून रीया तंतरली. तिने जरा बिचकतच दोघींना घरात घेतलं आणि पाणी आणायला आत पळाली.  मुग्धाला पण वसुंधराला अस अचानक घरी आलेल पाहून आश्चर्य वाटलं. स्वता:ला सावरत तिने दोघींच हसून स्वाग...

गुप्त समेवर - भाग ८

Image
      “ इतके दिवस झालेत पुण्यात येऊन पण विशेष काहीच हाती लागलं नाही , काल इंस्पेक्टर प्रधान म्हणाले तस आपण वेळ वाया घालवतोय का ?”       हॉल मध्ये फेर्‍या मारता मारता रीया मुग्धाशी बोलत होती. पुण्यात आल्यानंतर दोघी आधी शारदाश्रम एनजीओ मध्ये जाऊन आल्या , तिथे यशोदाने आधी फोन करून ठेवल्याने एनजीओ च्या संचालिका संगीता ताईंनी स्वता मुगधाची भेट घेतली होती. मुग्धा १६ वर्षांपूर्वी यशोदाला दवाखान्यात कशी भेटली ते तीच एनजीओच्या शारदाश्रम कडून झालेल तीच दत्तकविधान ही सारी माहिती दिली तसेच अजून माहिती हवी असल्यास त्यावेळी पोलिस तपास करणारे इंस्पेक्टर प्रधान यांना भेटण्याचा सल्ला पण दिला. एनजीओ कडून मुग्धाला नवी कसलीच माहिती मिळाली नाही. मग दोन दिवसानी रियाचे पप्पा कमिशनर देशमुखांच्या   ओळखीतून रिटायर्ड इंस्पेक्टर प्रधानचा पत्ता मिळवून त्या दोघी त्यांना भेटायला गेल्या.. साठीचे असले तरी इ.प्रधान अजूनही एकदम तडफदार आणि तल्लख बुद्धीचे होते. मुग्धाने त्यांना भेटण्याच प्रयोजन सांगताच थोडा वेळ विचार करून त्यांनी त्यावेळी घडलेली सारी हकीकत   त...