गुप्त समेवर - भाग १२





“एक्सक्यूज मी नेने मॅडम?”

मागून कुणीतरी आवाज दिल्याने वसुंधरा कॉलेज कॅंटीनच्या बाहेर अडखळली, तिने मागे वळून पाहिले. आसिस्टंट प्रो.लिमये धापा टाकत समोर वसुंधराच्या समोर आला,

“सॉरी मॅडम, हे दिल्लीच्या सेमिनार साठी लागणारे पेपर तुम्ही तातडीने मला सबमिट करायला संगितले होते, करेक्शन करून मी तुम्हाला द्यायला तुमच्या केबिन मध्ये गेलो तर प्यूनकडून कळलं तुम्ही इकडे आलात सो...” 

“ओके… पाहते मी.”

      वसुंधराने लीमयेंकडून ती फाइल घेतली. वसुंधरा प्रो.लिमयेशी बोलत असतानाच कॅंटीन मधून बाहेर पडलेली मुग्धा तिच्यामागून गेली. वसुंधरा कॅंटीनमध्ये जाईपर्यंत मुग्धा गाडी काढून कॉलेज कॅम्पस बाहेर पडली होती. वसुंधराने कॅंटीन मध्ये पाऊल टाकताच आत्तापर्यंत तिथे सुरू असणारा गोंधळ एकदम शांत झाला. तिला सगळीकडे पाहिल, तिथे कुठेच मुग्धा नव्हती पण रीया मात्र दिसली. वसुंधरा मॅडम आपल्याकडेच येत असल्याच पाहून रीया आणि तिच्या मैत्रिणी ताडकन उभ्या राहिल्या. त्यांना बसायला सांगून वसुंधराने मुग्धाची चौकशी केली. ती आत्ताच कॅंटीन बाहेर पडली अस समजल्यावर वसुंधराने रीयाकडून मुग्धाचा मोबाइल नंबर घेतला आणि तो डायल करत कॅंटीन बाहेर पडली. कदाचित गाडी चालवत असल्याने मुग्धाने फोन घेतला नसावा असा विचार करून वसुंधरा तिच्या केबिनमध्ये बसून मुग्धाच्या फोनची वाट पाहू लागली.

      मुग्धाबद्दल मिळालेल्या माहितीवरून मुग्धाची खरी ओळख वेगळीच असावी याची खात्री वसुंधराला पटली होती आता तिला भेटून तिच्या खर्‍या अस्तित्वाची जाणीव तिला आहे की नाही हे वसुंधराला पहायच होत शिवाय इतके दिवस जतन केलेली एक अमानत मुग्धाला सुपूर्द करायची होती. अजून खूप सार्‍या गोष्टी स्पष्ट करायच्या होत्या. यात खूप मोठा धोका असला तरी वसुंधरा होणार्‍या परिणामांना सामोरे जायला तयार होती. १६ वर्षांपूर्वी केलेली चूक आता पुन्हा तिला करायची नव्हती. त्यासाठी सर्वात आधी एका माणसाचा बंदोबस्त तिला करण गरजेचं होत. या सगळ्या विचारांनी एक अनामिक भीती वसुंधरेच्या मनात दाटून आली.

      मुग्धा लगबगीने कॉफीशॉपमध्ये शिरली, समोरच्या टेबलवर तिची वाट पहात बसलेला आर्यन तिला दिसला. तिला पाहून आर्यनने हात हलवून ‘hi’ केल. त्याच्याकडे जात मुग्धा म्हणाली,

“सॉरी उशीर झाला का मला? ट्रॅफिक खूप होत न!” 

Its ok… मी पण आत्ताच आलो”

“तू...”

      मुग्धा मध्येच थांबली, भेटल्यावर लगेच ब्रेसलेट मागण तिला योग्य वाटलं नाही, पण आर्यनने तिच्या मनातलं ओळखल्यासारख ते ब्रेसलेट खिशातून काढून मुग्धाला दिल.

“आणल आहे मी तुझ ब्रेसलेट! त्यादिवशी ते ब्रेसलेट माझ्या शर्टला अडकलेल दिसलं त्यासाठी  तुला कॉल केला होता, पण...”

मुग्धा अत्यंत काळजीपूर्वक ते ब्रेसलेट पर्स मध्ये ठेवत होती, आर्यनच बोलणं ऐकून तिला एकदम ओशाळल्यासारख झाल. ती पटकन म्हणाली,

“सो सॉरी आर्यन! तुझा फोन आला तेव्हा मी ते ब्रेसलेट शोधत होते आणि तू काही तरी मस्करी करू लागला, मग ब्रेसलेट हरवल्याच सगळ फस्ट्रेशन तुझ्यावर...खरच सॉरी!

मुग्धा अगदी कान धरून माफी मागत होती. आर्यनला ते पाहून हसू आल, त्याच्या मनातील अढी दूर झाली होती. इतका वेळ फॉर्मल बोलणारा आर्यन नेहमीच्या स्टाइल मध्ये बोलू लागला,

“भा.पो. (भावना पोचल्या)! आता काही ऑर्डर करायच की फुकट एसी ची हवा खात बसायच?

      आर्यनला हसताना पाहून मुग्धाला पण बर वाटलं. सेल्फ सर्विस असल्याने आर्यन उठून कॉफी घ्यायला काऊंटरकडे गेला. रीयाला ब्रेसलेट मिळाल्याच कळवाव म्हणून मुग्धाने मोबाइल काढला. तिला एका अनोळखी नंबरवरुन आलेले दोन मिस्ड कॉल दिसले. मुग्धाने तो नंबर डायल केला, एकाच रिंगमध्ये पलीकडून फोन उचलला गेला आणि वसुंधरा मुग्धाशी बोलू लागली,

“हॅलो मुग्धा! मी वसुंधरा नेने बोलत आहे. तुझ्याशी काही महत्त्वाचं बोलायच आहे, भेटुनच बोलूया!”

“ठीक आहे मॅम, मी कॉलेज बाहेर आहे...१० मिनिटात येते.

      वसुंधरा मॅमचा आवाज ऐकून मुग्धाला जरा टेंशन आल. आर्यनला तिने ऑर्डर कॅन्सल करायला लावली आणि आत्ता कॉलेजमध्ये काही अर्जंट काम आहे, तर तिला लगेच निघाव लागेल अस सांगितली. खर तर दोघांना पण अजुन बरच काही बोलायची इच्छा होती तरी नाईलाजाने ते दोघे कॉफीशॉप बाहेर पडले. दोघांच्या गाड्या वेगवेगळ्या पार्किंग लॉट मध्ये असल्याने दोघे दोन दिशांना गेले. मुग्धा तिची गाडी काढणार इतक्यात तिचा फोन वाजला, पुन्हा वसुंधरा मॅमचा फोन आलेला पाहून मुग्धाने तो लगेच घेतला, वसुंधराने मुग्धाला त्या कॉफीशॉप मध्येच थांबायला सांगितलं, ती स्वता: तिथे येऊन मुग्धाला भेटणार होती. मुग्धाला नक्की काय सुरू आहे ते कळत नव्हतं. ती पुन्हा कॉफीशॉप मध्ये जाऊन वसुंधराची वाट पाहू लागली. शांत बसल्यावर तिला आर्यनने परत केलेल्या त्या ब्रेसलेटची आठवण झाली, तिने ते पर्स मधून काढले. ते ब्रेसलेट जरा वेगळच वाटलं तिला. मोठ्या कुतुहलाने ती ते ब्रेसलेट पाहू लागली. काही धड आकार नसलेले, छोटे छोटे आकार एका साखळीत गुंफलेले होते. त्या प्रत्येक तुकड्यावर सुंदर नक्षीकाम केल होत. मुग्धा एकेक आकार हातात धरून इतक्या एकाग्रतेने ते न्याहाळत होती की तिच्या समोरच्या खुर्चीत वसुंधरा येऊन बसलेली तिला कळलं नाही.

“सुटलं का कोड या ब्रेसलेटच?”

वसुंधराचा आवाज ऐकून मुग्धा एकदम दचकून गेली.

“सॉरी मॅम...माझ लक्ष नव्हतं, तुम्ही कधी आलात ते कळलं नाही.”

“ठीक आहे ग!. आपण आपल्याच तंद्रीत हरवलेले असतो आणि आजूबाजू एकदम भयानक काही होऊन जात!”

मुग्धाला नक्की त्या काय बोलताय ते समजत नव्हतं तिने फक्त मान डोलावली. वसुंधरा पुढे बोलू लागली.

“सो मुग्धा श्रीकांत साठे... हेच आहे नं तुझ नाव??”

“अsss हो!”

मुग्धा जरा गोंधळून म्हणाली. अजून तरी हेच नाव म्हणजे तिची ओळख होती, तिला तीच खर नाव कुठे ठाऊक होत! मुग्धाच्या डोळ्यात पहात वसुंधरा म्हणाली,

“तुझे डोळे तर काही वेगळच सांगत आहेत! बर एक गोष्ट सांग मला, तुझ आणि शारदाश्रमच काय कनेक्शन आहे?

      मॅमला सगळ खर सांगावं अस मुग्धाला वाटत होत, ती मॅमची नजर टाळून आजूबाजू पाहू लागली. दुपारची वेळ असल्याने कॉफीशॉप मध्ये तुरळक गर्दी होती. दोन टेबलवर एकमेकात हरवलेले कपल्स होते, बाजूच्या टेबलवर एक कॉलेज तरुणांचा ग्रुप दंगा घालत होता तर वसुंधरा मॅमच्या मागे तीन लोकांची ऑफिस मीटिंग सुरू होती. त्यापैकी एका माणसाच्या डोक्यावर अविकाकासारखी कॅप होती, पण तो पाठमोरा असल्याने मुग्धाला चेहरा काही दिसला नाही. अविकाका अश्या साध्या कॉफीशॉप मध्ये मीटिंग घेण शक्य नव्हतं, शिवाय त्याच ऑफिस पण इथून खूप लांब होत. तो माणूस दुसराच कुणी असेल असच मुग्धाला वाटल. पण त्यामुळे मुग्धाला अविकाकाने वसुंधरा किंवा इतर कुणालाही स्वता:बद्दल काही सांगायचं नाही, याची आठवण झाली. ती वसुंधराशी काहीच बोलली नाही, खाली पहात उगाच केसांच्या बटा कानामागे घेउ लागली. तिचे डोळे आणि गोंधळून गेल्यावर अस केसांच्या बटा सावरण्याची सवय पाहून वसुंधरा अनाहूतपणे बोलली,

“अगदी तीच सवय... आईवर गेली आहेस तू! इतका विचार नको करू काही. पण तुझी खरी ओळख वेगळीच आहे याची मला खात्री पटली! आणि मला ती माहिती आहे. आणि हो ते ब्रेसलेट म्हणजे एका रहस्याकडे नेणारा दुवा आहे, archaeology student असल्याने तुला ते कोड नक्की सुटेल. आता निघते मी... थोड्या वेळात माझी फ्लाइट आहे, दिल्लीच्या एका  सेमिनारला जायच आहे! आल्यावर तुला बोलायच असेल तेव्हा भेटू पुन्हा...बाय”

      एव्हढ बोलून वसुंधरा आली तशी भरकन उठून निघाली. आत्ता वसुंधरा मॅम नक्की काय सांगत होत्या, याचा अर्थ लावत मुग्धा विस्मयाने पाठमोर्‍या वसुंधराकडे बघू लागली. वसुंधरा मॅमन थांबवून त्यांना सगळ्याच स्पष्टीकरण विचाराव म्हणून मुग्धा पर्स मध्ये ते ब्रेसलेट ठेऊन पटकन टेबलवरून उठली आणि कॉफीशॉप बाहेर पडली. कॉफीशॉप मध्ये इतकवेळ मुग्धा आणि वसुंधराला दिसू नये म्हणून मेन्यूकार्ड मागे चेहरा झाकलेल्या अविनाशने त्याची कॅप व्यवस्थित केली. आज योगायोगाने त्याला वसुंधरा मुग्धाला लवकरच तीच सत्य सांगणार आहे हे समजलं होत. वसुंधराला मुग्धापासून दूर ठेवण्यासाठी काही तरी ठोस पाऊल उचलण्याची तयारी अविनाश करू लागला!   

क्रमश:

गुप्त समेवर - भाग १३

गुप्त समेवर - भाग  ११

Comments

लोकप्रिय

गुप्त समेवर - भाग १

नवदुर्गा- गोष्ट ' ती ' च्या विविध रूपांची- १. देवी शैलपुत्री

नवदुर्गा- गोष्ट ' ती ' च्या विविध रूपांची- २. देवी ब्रम्हचारिणी

गुप्त समेवर- भाग १७

नवदुर्गा- गोष्ट ' ती ' च्या विविध रूपांची -३. देवी चंद्रघंटा