गुप्त समेवर - भाग १०



खूप दिवसांच्या प्रयत्नांनि मुग्धाच्या हाती तिच्या भूतकाळातील एक वस्तु मिळणार होती. कधी एकदा शारदाश्रम मध्ये जाऊन संगीता ताईना भेटतेय आणि ती वस्तु घेतेय अस झाल्याने घाईघाईत मुग्धा तिचा मोबाइल घरीच ठेऊन आली होती. तिथे संचालकांच्या  केबिनमध्ये संगीता ताई मुग्धाची वाट पहात होत्या. मुग्धाला समोरच्या खुर्चीवर बसायला सांगून त्यांनी बाजूच्या कपाटातून एक छोटासा बॉक्स काढून तो मुग्धासमोर टेबलवर ठेवला आणि म्हणाल्या,

“हे घे तुझी अमानत! तू येऊन गेल्यावर मी तुझ्याविषयीच्या सगळ्या जुन्या फाइल चेक केल्या, त्यावेळी मला या वस्तूची नोंद एका ठिकाणी दिसली. तुला दवाखान्यात आणल होत तेव्हा तुझ्या हातात एक ब्रेसलेट होत जे तुझ्यावर उपचार सुरू असताना नर्सने बाजूला काढून ठेवलं पण तेव्हा ते गहाळ झाल. तुला दत्तक घेऊन साठे मुंबईला शिफ्ट झाल्यावर काही दिवसानी ती नर्स शारदाश्रमला आली आणि तिने ते ब्रेसलेट इथे जमा केल होत. त्यावेळी ते तुझ्यापर्यंत पोचवायच राहून गेल. त्याची नोंद दिसल्यावर शारदाश्रमच्या स्टोररूम मधून ते शोधून काढलं.”

तो बॉक्स हातात घेत मुग्धा म्हणाली,

“थॅंक यू सो मच ताई! तुम्ही वेळ काढून हे शोधल आणि मला दिल. हि खूप छोटीशी वस्तु असली तरी माझ्यासाठी खूप अमूल्य आहे!”

“माझ कामच आहे ते मुग्धा. काही मदत हवी असल्यास सांग. आता एक महत्त्वाची मीटिंग आहे माझी. भेटू पुन्हा...”

मुग्धाने तो बॉक्स पर्स मध्ये ठेवला आणि ती शारदाश्रम मधून बाहेर पडली. कधी एकदा ते ब्रेसलेट पाहतेय अस तिला झाल होत. पुण्याच्या ट्रॅफिक मधून गाडी काढत फ्लॅट वर पोचेपर्यंत मुग्धाचा जीव अगदी कासावीस झाला होता. फ्लॅटच लॉक उघडून आत येतायेताच तिने पर्स मधून तो बॉक्स काढला आणि त्यातील ते ब्रेसलेट काढलं, साध मेटलच ब्रेसलेट असलं तरी इतक्या वर्षांनंतर पण ते एकदम नवीन वाटत होत. एका साखळी मध्ये कलाकुसर केलेले वेगवेगळे सुंदर आकार गुंफले होते, अॅडजस्टेबल हूक्स असल्याने ते कुणालाही घालता आल असतं. मुग्धाने ब्रेसलेट डोळे भरून पाहिल आणि हृदयाशी कवटाळल, जणू आपले गमावलेले आईबाबाच भेटल्याचा भास तिला झाला आणि तिचे डोळे झरू लागले. इतक्यात  आतून जोरात आवाज आल्याने मुग्धा दचकली, कुणीतरी घरात शिरल असावं अस तिला वाटल. तिने ते ब्रेसलेट पटकन तिच्या हातावर बांधलं आणि आवाज न करता एका हातात झाडू घेऊन बेडरूमकडे गेली. आत डोकावून पाहिल्यावर तिला दिसलं की, गॅलरीतून कुणी तरी बेडरूम मध्ये घुसल होत. तो  माणूस पाठमोरा असल्याने त्याचा चेहरा काही दिसत नव्हता. मुग्धा झाडू घेऊन त्याच्या दिशेने धावली, तिची चाहूल लागल्याने तो माणूस तिच्याकडे वळाला आणि समोर आर्यनला पाहून गडबडून गेलेल्या मुग्धाचा तोल गेला. आर्यनने चपळाईने पडणार्‍या मुग्धाला त्याच्या मजबूत हातांनी सावरले, प्रतिक्षिप्त क्रियेनुसार आधारासाठी मुग्धाने पण दोन्ही हातानी त्याला घट्ट पकडून ठेवले. त्याला मारण्यासाठी उगारलेला झाडू तिच्या हातातून कधीच पडून गेला होता! काही क्षण दोघे एकमेकांच्या डोळ्यात हरवून गेले. आर्यन भान हरपून मुग्धाच्या डोळ्यात पहात होता, बॅकग्राऊंडला एखाद रोमॅंटिक संगीत वाजत असल्याचा त्याला भास झाला. मुग्धाची पण तीच अवस्था होती, आर्यनच्या डोळ्यांत तिच्याबद्दलच प्रेम दिसत असलं तरी तिला स्वप्नात दिसणार्‍या त्या भीतीदायक डोळ्यांची आठवण झाली! मुग्धाने स्वता:ला सावरले आणि त्याच्यापासून दूर झाली. मुग्धाच्या हातातून पडलेल्या  झाडूकडे पहात आर्यन मिष्किलपणे म्हणाला,

“घरी आलेल्या पाहुण्याच झाडूने स्वागत करायची ही निराळीच तर्‍हा आहे तुझी!”

मुग्धा- “पाहुण्याने दारातून घरात याव, जर अस चोरासारखा घुसेले तर असच स्वागत होईल न!”

आर्यन- “मग काय करू?? दूसरा काही ऑप्शन नव्हता तुला किती फोन केले मी आणि रीयाने. तु एकदाही फोन घेतला नाही, रीयाला खूप टेंशन आल होत आधी फोन करून बोल तिच्याशी! आणि ओ मिस्स जरा पाणी बिणी द्याल का? इतके कष्ट करून थर्ड फ्लोरला चढून आलोय!”

      रीयाला फोन केल्यावर ती किती घाबरली होती ते मुग्धाला जाणवलं. मुग्धाच्या फोन विसरून जाण्यावरून झापून झाल्यावर रीयाने आर्यन तिथे का आला याची सारी हकीकत सांगितली. मूव्ही इंटर्व्हल मध्ये आर्यनचा कॉल आल्यावर त्यांनी मुग्धाला बोलावून डिनर प्लान केला. त्यासाठी रियाकडून अॅड्रेस घेऊन आर्यन मुग्धाला पीक करायला निघाला. इकडे रीयाने त्यांचा प्लान सांगायला  अनेकदा फोन केल्यावर पण मुग्धाने फोन घेतला नाही. आर्यन अॅड्रेस वर पोहचल्यावर त्याला फ्लॅट लॉक असल्याच समजलं. मुग्धा आजपर्यंत अस फोन विसरून रीयाला काहीही न सांगता कुठे गेली नव्हती. मुग्धाची आत्ताची अवस्था माहीत असल्याने रीयाला खूप काळजी वाटू लागली. मुग्धाला काही त्रास होऊन ती फ्लॅट मध्येच बेशुद्ध पडली नाही न असे काही विचार मनात आल्याने रियानेच आर्यनला फ्लॅटच्या गॅलरीतून आत शिरण्याचा सल्ला दिला होता. रीयाची माफी मागून, परत तिला न सांगता अस फोन विसरून जाणार नाही अस समजाऊन मुग्धाने फोन कट केला.

      मुग्धाने गॅलरीतून जाऊन पाहिले, गॅलरीच्या रेलिंगला अडकवलेल्या क्लाएंबिंग रोपवरून तीन मजले चढून यायला आर्यनला किती त्रास झाला असेल, याची तिला जाणीव झाली. तो रोप घेऊन हॉल मध्ये जात मुग्धा आर्यनला म्हणाली,

“अश्या दोरीला पकडून इतक्या उंच चढायला तू काय spiderman आहेस का?”

“तुझ्यासाठी spiderman काय सुपरमॅन, batman अगदी शक्तिमान पण होऊ शकतो मी!” आर्यन सगळ्यांची पोझ घेत म्हणाला. त्याच्या वेडेपणावर गालातल्या गालात हसत मुग्धा म्हणाली,

“नेहमीच सगळ्या मुलींशी अस फ्लर्ट करतो का तू?”

“नाही आणि कधी कुणाच्या काळजीने अस तीन मजले चढून पण नाही गेलो अजून!” थोडसं हर्ट झालेला आर्यन मुग्धाच्या डोळ्यात पहात अगदी मंनापासून बोलला. त्याच्या बोलण्यातला खरेपणा आणि त्यामागचा अर्थ कळून पण काही न कळल्यासारख दाखवत मुग्धा त्याची नजर टाळून उठली,

“चल निघूया! रीया आणि स्वरा हॉटेलमध्ये वाट पहात असतील.”

      दोघे निघाले, हॉटेल मध्ये पोहचेपर्यंत दोघेही एक शब्द बोलले नाहीत. काहीही न बोलता होणारा मनाचा संवाद आज पहिल्यांदाच ते अनुभवत होते. स्वरा आणि रीया भेटल्यावर नॉर्मल होत सगळ्यांनी छान गप्पा मारत जेवण केल. मुग्धा आणि रीया फ्लॅट वर परत आल्यावर मुग्धाने रीयाला संगीता ताईंचा आलेला फोन आणि ते ब्रेसलेट याबद्दल सांगितलं आणि हात पुढे करून ते ब्रेसलेट दाखवू लागली, दोघी एकदम चमकून गेल्या कारण मुग्धाच्या हातात ते ब्रेसलेट नव्हतं!

क्रमश:


गुप्त समेवर - भाग ११

आईची पाककला आणि लेकीचे विडंबन



गुप्त समेवर - भाग ९


Comments

लोकप्रिय

गुप्त समेवर - भाग १

नवदुर्गा- गोष्ट ' ती ' च्या विविध रूपांची- १. देवी शैलपुत्री

नवदुर्गा- गोष्ट ' ती ' च्या विविध रूपांची- २. देवी ब्रम्हचारिणी

गुप्त समेवर- भाग १७

नवदुर्गा- गोष्ट ' ती ' च्या विविध रूपांची -३. देवी चंद्रघंटा