नवदुर्गा- गोष्ट ' ती ' च्या विविध रूपांची - ९. देवी सिद्धीदात्री
मागील भाग वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा नवदुर्गा- गोष्ट ' ती ' च्या विविध रूपांची - ८.देवी महागौरी ९. देवी सिद्धीदात्री "आज नवरात्रीचा शेवटचा दिवस म्हणजेच नवमी, नवरात्रीत देवीच्या विविध रुपांची मनोभावे आराधना केल्यावर नवव्या दिवशी देवी सिद्धीदात्री या रूपात प्रगटते. देवी आदिशक्तीची उपासना करून भगवान शकरांनी देवीकडे पूर्णत्वाची मागणी केली. देवीने सिद्धीदात्रीचे रूप धारण करून शंकरांना सर्व सिद्धि प्रदान केल्या आणि शंकरांचे अर्धे शरीर देवीचे झाले. त्यामुळे भगवान शंकरांना अर्धनारी नटेश्वर हे रूप प्राप्त झाले. मार्कण्डेय पुराणात अणिमा, महिमा, गरिमा, लघिमा, प्राप्ति, प्राकाम्य, ईशित्व आणि वशित्व ह्या आठ सिद्धि तर ब्रह्मवैवर्तपुराणच्या श्रीकृष्ण जन्म खंड मध्ये अठरा सिदधींचा उल्लेख आहे. नावावरूनच लक्षात येत की सिद्धीदात्री म्हणजेच सिद्धि देणारी. अनेक साधू, ऋषिमुनि सिद्धि मिळवण्यासाठी तप करतात, तप म्हणजे बारा वर्षाचा काळ! हयातून आपण काय शिकायच?? सिद्धि याचा अर्थ पूर्णत्व, नैपुण्य, कौशल्य असा...