नवदुर्गा- गोष्ट ' ती ' च्या विविध रूपांची -४. देवी कुष्मांडा

 

मागील भाग वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा 


४. देवी कुष्मांडा 
“आज नवरात्र चतुर्थी, देवी कुष्मांडाच्या उपासनेचा दिवस! ज्यावेळी हे विश्व अस्तित्वात नव्हते, सगळीकडे फक्त अंधाराचे साम्राज्य होते, तेव्हा आदिमायेने देवी कुष्मांडाचे रूप धारण केले. देवीच्या स्मित हास्यातुन सगळीकडे प्रकाश पसरला, पंचतत्व आणि या ब्रह्मांडाची निर्मिती झाली. देवी सूर्याच्या केंद्रस्थानी असून सूर्याला म्हणजेच सार्यां विश्वाला ऊर्जा प्रदान करते. 
कु- सूक्ष्म, उष्मा- ऊर्जा, अंडा- बीज, छोटेसे ऊर्जेचे बीज म्हणजेच कुष्मांडा! आताहे छोटेसे असले तरी त्यातील ऊर्जा मात्र सर्वव्यापी आहे. देवी सर्वत्र प्राणशक्तीच्या म्हणजे ऊर्जेच्या रूपात असते. आपण मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करताना एक हात आपल्या हृदयावर आणि एक हात मूर्तीच्या हृदयावर ठेऊन आपल्यातील प्राणरूपि ऊर्जा मूर्तीत प्रतिष्ठित व्हावी अशी प्रार्थना करतो. या सृष्टीच्या निर्मितेचे कारण असलेल्या आपणा सर्वांमध्ये प्राणशक्तीच्या रूपात वास्तव्य करणार्याठ उर्जेला आज जागृत करूया. जय देवी कुष्मांडा!!!”
एफएम वरती देवीच्या कुष्मांडा या रूपाची महती ऐकत असताना इंस्पेक्टर सिद्धिच्या नजरेसमोर दुर्गा साठे यांनी स्वत:च्या हिमतीवर उभारलेली सामाजिक संस्था येत होती. कालच ती तिथे चौकशीसाठी जाऊन आली होती. शहरापासून थोड्याश्या अंतरावर वसलेली ती संस्था, त्या संस्थेचे भव्य आवर आणि त्याच्या आश्रयाखाली असणारी लोकांची संख्या पाहून ती थक्क झाली होती. इतक्या मोठ्या प्रमाणात सामाजिक कार्य करणारी संस्था असूनही कोणताही गाजावाजा न करता प्रसिद्धीपासून नेहमी दूर राहून अत्यंत सचोटीने समाजातील दुर्लक्षित, पीडित, सोडून दिलेल्या आणि गरजू व्यक्तींना सामावून घेत त्यांना जगण्याची ऊर्जा देत होती. दुर्गा साठे यांचे कार्य खरच किती अफाट आहे याची प्रचिती इंस्पेक्टर सिद्धिला तेथील लोकांची चौकशी केल्यावर आली. इंस्पेक्टर सिद्धि संस्थेच्या ऑफिस मधील कर्मचार्यांोना दुर्गा साठे बेपत्ता होण्यापूर्वी इथे का आल्या होत्या किंवा कुणाला भेटल्या होत्या याची विचारणा करू लागली. पण कुणालाच याबद्दल काहीच माहिती नव्हती. संस्थेच्या ऑफिस मधील कर्मचार्यांाशी बोलत असताना संस्थेतील हजारो लोक तिला भेटायला जमा झाले आणि दुर्गा साठे यांना लवकरात लवकर शोधा म्हणून हात जोडून विनवू लागले. दुर्गा साठे म्हणजे त्यांना जगण्याची दिशा दाखवणारा आशेचा स्त्रोत होता. कोण नव्हतं त्यांच्या संस्थेत? एक दिवसाच्या अर्भकापासून अगदी शंभरी गाठलेल्या आजोबांपर्यंत जगाने नाकारलेले, झिडकारलेले अनेक निष्पाप जीव, आधारहीन विधवा आणि परित्यक्ता, आईबापाला ओझ झालेले जगाच्या दृष्टीने अपंग मुले!!! या सार्यांधच अंधकारमय असणार आयुष्य दुर्गा साठेनी उजळून टाकल होत. या संस्थेत अश्या हजारो लोकांना समाविष्ट करून, त्यांच्यातील गुण हेरून अनेक छोटे छोटे काम देऊन, प्रत्येकाला जगण्याच एक उद्दीष्ट दिल होत त्यांनी. संस्थेचे ब्रीदवाक्य ‘तिमिरातून तेजाकडे’ खर्या् अर्थाने सार्थ झाल होत. दुर्गा साठेनी तेथील प्रत्येक व्यक्तीची जातीने विचारपूस करून त्यांना नेहमी जगण्याचे बळ दिले होते. तेथील प्रत्येकासाठी त्या आई झाल्या होत्या, सगळ्यांना सतत ऊर्जा देणार्याह देवी कुष्मांडाच जणू! इंस्पेक्टर सिद्धिने त्यां सर्वांना त्यांनी पोलिसांना सहकार्य केले तरच ती दुर्गा साठे यांचा शोध घेऊ शकेल असेल सांगितले आणि त्यादिवशी दुर्गा साठे इथे आल्याचे कुणाला माहीत असल्यास पुढे येऊन बोलण्यास सांगितले. पण त्यावेळी कुणीच काही बोलले नाही.
इंस्पेक्टर सिद्धिने संस्थेचे सारे व्यवहार, इतर कागदपत्रे आणि नोकरचाकर तसेच सर्व विभाग प्रमुख यांची कसून चौकशी करण्याचे आदेश तिच्यासोबत असलेल्या सब इंस्पेक्टर भावे आणि हवालदार काळे यांना दिली. ती स्वता पूर्ण संस्थेची पाहणी करायला निघाली. ती एकेका विभागातून जात असताना कुणीतरी तिच्या मागावर असल्याचे तिला जाणवले. ती मुद्दाम एका खोलीत शिरली आणि तिच्या मागावर असलेल्या मुलाला पकडले. साधारण १३ वर्षांचा धडधाकट मुलगा असून संस्थेत काय करतोय याचे सिद्धिला नवल वाटले. तिला अस समोर आलेल पाहून तो गडबडला. त्याला घेऊन इंस्पेक्टर सिद्धि ऑफिस मध्ये गेली. तेथील कर्मचार्यांोनी सांगितले की हा विशाल अनाथ असून त्याला बोलता येत नाही. इंस्पेक्टर सिद्धिने विशालची प्रेमाने विचारपूस केली, त्याला पाणी देऊन काही माहिती असल्यास न घाबरता सांग असे समजावले. त्यानंतर विशाल जरा सावरला हातवारे करून काही सांगू लागला. त्याच्या खाणाखुणावरून इंस्पेक्टर सिद्धिने ओळखले की स्वराकडून मिळालेली माहिती खरी होती. दुर्गा साठे गायब होण्यापूर्वी संस्थेच्या आवारात आल्या होत्या परंतु आत गेल्या नाहीत त्यांना तेथेच एक व्यक्ती भेटली आणि ती व्यक्ती त्यांच्यासोबत गाडीत बसून गेली होती.
क्रमश:

Comments

लोकप्रिय

गुप्त समेवर - भाग १

नवदुर्गा- गोष्ट ' ती ' च्या विविध रूपांची- १. देवी शैलपुत्री

नवदुर्गा- गोष्ट ' ती ' च्या विविध रूपांची- २. देवी ब्रम्हचारिणी

गुप्त समेवर- भाग १७

नवदुर्गा- गोष्ट ' ती ' च्या विविध रूपांची -३. देवी चंद्रघंटा