नवदुर्गा- गोष्ट ' ती ' च्या विविध रूपांची - ९. देवी सिद्धीदात्री

 


मागील भाग वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा  


९. देवी सिद्धीदात्री
"आज नवरात्रीचा शेवटचा दिवस म्हणजेच नवमी, नवरात्रीत देवीच्या विविध रुपांची मनोभावे आराधना केल्यावर नवव्या दिवशी देवी सिद्धीदात्री या रूपात प्रगटते.  देवी आदिशक्तीची उपासना करून भगवान शकरांनी देवीकडे पूर्णत्वाची मागणी केली. देवीने सिद्धीदात्रीचे रूप धारण करून शंकरांना सर्व सिद्धि प्रदान केल्या आणि शंकरांचे अर्धे शरीर देवीचे झाले.  त्यामुळे भगवान शंकरांना अर्धनारी नटेश्वर हे रूप प्राप्त झाले. मार्कण्डेय पुराणात  अणिमा, महिमा, गरिमा, लघिमा, प्राप्ति, प्राकाम्य, ईशित्व आणि  वशित्व ह्या आठ सिद्धि तर  ब्रह्मवैवर्तपुराणच्या  श्रीकृष्ण जन्म खंड मध्ये  अठरा सिदधींचा उल्लेख आहे.  

नावावरूनच लक्षात येत की सिद्धीदात्री म्हणजेच सिद्धि देणारी. अनेक साधू, ऋषिमुनि सिद्धि मिळवण्यासाठी तप करतात, तप म्हणजे बारा वर्षाचा काळ!  हयातून आपण काय शिकायच??  सिद्धि याचा अर्थ पूर्णत्व, नैपुण्य, कौशल्य असा पण होतो, तोच आपल्याला अपेक्षित आहे. एखाद्या गोष्टीत नैपुण्य कधी मिळेल? आपण ती गोष्ट सातत्याने केली तरच! म्हणजेच जस नऊदिवस देवींची उपासना केली तर शेवटच्या दिवशी देवी सिद्धीदात्री आपली मनोकामना पूर्ण करते तसच जर एखाद्या गोष्टीचा ध्यास घेऊन आपण ती खंड पडू न देता नेहमी करत राहिलो तर निश्चितच त्यामध्ये आपल्याला प्राविण्य मिळेल!

नवरात्री स्पेशल सेग्मेंट- 'नवदुर्गा' इथेच  संपत आहे, तुम्हा सर्वांना  दसर्‍याच्या खूप खूप शुभेच्छा....."


आज दसर्‍यानिमित्त सिद्धि तिच्या कुटुंबासोबत शहराबाहेरील टेकडीवरील मंदिरात जाण्यासाठी निघाली होती. देवीचे दर्शन घेऊन परतीच्या प्रवास सुरू होता. नीरज एफएम ऐकत ड्राइव करत होता तर सिद्धि शांतचित्ताने बाजूच्या सीटवर बसून प्रवासाचा आनंद घेत होती. मस्त लॉन्ग कुर्ती आणि जीन्स, छोटासा क्लचर लावून पाठीवर मोकळे सोडलेले केस, कानात टॉप्स, गळ्याभोवती छोटसं मंगळसूत्र, हातात घड्याळ, काजळ आणि हलकीशी लिपस्टिक इतकासाच मेकअप  करून पण सिद्धि खूप सुंदर दिसत होती. सकाळी आवरून बाहेर पडतानाच नीरजच्या नजरेतून तिला हे समजले होते. आत्ता पण छान रोमॅंटिक गाण सुरू झाल्यावर नीरजने सिद्धीकडे पाहून डोळा मारला, सिद्धिने त्याला  मागे सासूबाई आणि परी असल्याच खुणावल. नीरजने तिला आरश्यातून दाखवलं, वार्‍याच्या मंद झुलकीने मागच्या सीटवरील सासुबाईंचा डोळा लागत होता तर  छोटी परी आजीच्या मांडीवर डोके ठेऊन शांत झोपली होती! नीरजचा खट्याळपणा अजून वाढायला नको  म्हणून मुद्दाम सिद्धिने सासुबाईंना आवाज दिला,

"आई दर्शन खूप छान झाल न?"

सिद्धिच्या बोलण्याने सासुबाई डोळ्यांवर आलेली झोप परतवत म्हणाल्या,

"हो गं! देवीच रूप किती तेजस्वी वाटत होत, सकाळी सकाळी गेल्याने काहीच गर्दी नव्हती, शांततेत दर्शन घेता आल."

"हो, तुमच्या देवदर्शनापायी सुट्टीच्या दिवशी पण मला पहाटे उठाव लागलं...तुम्ही दोघी मिळून नुस्ता त्रास देतात मला...." 

" गप रे तू...एखाद दिवस झोप कमी झाली तर काही बिघडत नाही.. माझी सिद्धि बघ केस सोडवेपर्यंत तहानभूक आणि झोप सोडून काम करते...." 

 सासुबाई नीरजला दटावत होत्या इतक्यात काही तरी लक्षात आल्याने  सिद्धीकडे पहात त्यांनी  विचारलं,

"अग दुर्गा साठे यांची सामाजिक संस्था इकडेच कुठे तरी आहे न?"

" हो आई... थोडसं पुढे डावीकडे एक फाटा फुटतो  तिथून थोड्याच अंतरावर आहे ती संस्था."

"खूप पाहिलं आहे टीव्हीवर, आत्ता जायच का आपण??"

"हो जाऊया की.."

छोटी परी पण डोळे चोळत उठली आणि अजून फिरायला मिळेल म्हणून आनंदी झाली. आता या तिकडीच एकमत झाल्याने संस्थेत जाण्याची इच्छा नसली तरी नीरजने गाडी संस्थेच्या दिशेने वळवली. सुट्टीचा दिवस पण दगदगीत जाणार म्हणून तो नाराज झाला. सिद्धिच्या ते लक्षात आले परंतु संस्थेत गेल्यावर त्याची नाराजी लगेच निघून जाईल याची तिला खात्री होती.  संस्थेच्या आवारात आल्यावर ती मोठी इमारत, त्यासमोर काढलेली रेखीव रांगोळी, दारावरील फुलांची तोरणं, आजूबाजूचा सुंदर झाडी यामुळे वातावरण एकदम प्रसन्न वाटत होते. संस्थेच्या इमारतीमध्ये गेल्यावर तेथील टापटीप आणि स्वच्छता पाहून आज पहिल्यांदाच तिथे आलेले नीरज, त्याची आई खूप प्रभावित झाले, तेथील कर्मचार्‍याने त्यांना  संस्थेत येण्याचे कारण विचारले असता सिद्धिने समोर येऊन तिची ओळख करून दिली.

"माफ करा मॅडम तुम्हाला ओळखलंच नाही" 

लगबगीने पुढे येत त्या कर्मचार्‍याने त्या सर्वांचे स्वागत केले आणि त्यांना आज संस्थेमध्ये जरा गडबड सुरू  असून  थोड्याच  वेळात दसर्‍याचा  कार्यक्रम सुरू होणार असल्याचे सांगितले आणि त्यांना संस्थेतील कार्यालयात नेले. तिथे दुर्गा साठे पण होत्या, त्यांना पाहून सिद्धिच्या सासुबाईंना विशेष आनंद झाला. चहा नाश्ता आणि एकमेकांची विचारपूस करून झाल्यावर दुर्गा साठे या स्वता: त्यांच्यासोबत गेल्या आणि त्यांनी संस्थेतील सार्‍या विभागांची माहिती करून दिली. छोटी परी तर कधीच तेथील बालचमूसोबत खेळण्यात दंग झाली होती. संपूर्ण संस्थेत फिरून कार्यालयात आल्यावर सिद्धिच्या सासूबाई दुर्गा साठे यांना हात जोडत म्हणाल्या,

"ताई तुम्ही खरच खूप महान कार्य करत आहात, टीव्हीवर पाहिल होतच पण आत्ता प्रत्यक्षात पाहिल्यावर तुमचं नुसतं  कौतुक करण्यापेक्षा नतमस्तक व्हावस वाटतं!"

त्यांचे हात हातात घेत दुर्गा साठे म्हणाल्या,

"अहो काही विशेष नाही करत मी. जमेल तशी समाजसेवा तर कित्येकजण करतात, माझ्या इतकच महत्त्वाचं कार्य तुमची सून करत आहे. आज तिच्यामुळेच मरगळीस आलेल्या या संस्थेला नव संजीवनी मिळाली. तसेच समाजातील कीड नाहीशी झाली. खरोखरीच सिद्धि देणारी आहे ही!  चला मागील पटांगणात रावणदहन कार्यक्रम सुरू होईल आता, आपण तिकडेच जाऊ. "

सगळे जण पटांगणात जमा झाले होते, पण रावणाची प्रतिकृती कुठे दिसत नव्हती.. छोट्या परीने उत्सुकतेने सिद्धिला विचारले,

"आई, इथे तर रावण नाहीये. मग कुणाला मारायच?"

तिला कडेवर घेत दुर्गा साठे म्हणाल्या,

"बाळा, आपल्या मनात लपलेल्या रावणाला मारायचे असते आज""

परी पुन्हा तिच्या वयाच्या  खेळायला पळाली. दुर्गा साठे सिद्धि, नीरज आणि सासुबाईंकडे पहात म्हणाल्या,

"आम्ही खूप वर्षांपासून दसर्‍याच्या दिवशी अनोख्या पद्धतीने रावणदहन करतो. सध्याच्या काळात रावण हा कित्येकांच्या मनातच असूया, व्देश, राग, संताप, खोटेपणा, मत्सर, भय, मोह इत्यादि अनेक रूपात दडलेला असतो. त्याला जर वेळीच जाळला नाही तर तो समाजासाठी घातक ठरू शकतो. म्हणून तर आम्ही इथे रावणाची प्रतिकृती उभी न करता प्रत्येकाने गेल्या वर्षात काय चुका, वाईट कृती केल्या किंवा कोणते वाईट विचार त्यांच्या मनात आले ते एका कागदावर लिहून काढायचे आणि समोरील गोलात टाकायचे, आणि सगळे एकत्र जाळायचे. ते जळत असताना त्या सर्व दुष्कृत्यांच- विचारांचं ईश्वराला साक्षी ठेऊन मनातून समूळ उच्चाटन करायच!  तुम्हाला पण ह्यात भाग घ्यायचा असेल तर तुमचं स्वागत आहे!"

 दुर्गा साठे यांच्या अनोख्या विचारांनी भारावून जात ते प्रत्यक्षात उतरवले आणि त्या उपक्रमात भाग घेतला. आज कित्येक वर्षांनी दुर्गा साठे यांनी पण एक कागद घेऊन त्यावर काही लिहून तो जाळायला दिला, सिद्धिला ते रुचल नाही. ती दुर्गा साठे यांच्याशी बोलली पण आजूबाजूच्या आवाजामुळे त्यादोघींमध्ये नक्की काय बोलणं झाल हे कुणाला कळलं नाही. संस्थेतील कित्येकांना प्रश्न पडला होता की इतक्या वर्षात कधीही दुर्गा बाईंनी  रावणदहनाच्या वेळी काही दिल नाही पण यवर्षात अस काय झाल??

सिद्धि आणि सगळे त्यांच्या घरी जाण्यासाठि निघाले. आजचा दसरा खूप छान झाल्याचा आनंद प्रत्येकाच्या चेहर्‍यावरून ओसंडून वहात होता. गाडी चालवत असताना त्याने सिद्धिला विचारले,

"तू काल त्या पत्रकाराने विचारलेला प्रश्न खुबीने टाळला होता आज पण संस्थेच पुनरुज्जीकरण होण्याच श्रेय दुर्गाबाई तुला देत होत्या, रावणदहनाच्या वेळी तुमच्यात झालेली गुप्त मसलत! दाल मे कुछ काला है!"

"ओह हो...आज खर तू माझा नवरा शोभला! तुला म्हणून सांगते, दुर्गा साठे यांचा शोध मला दुसर्‍याच दिवशी लागला होता..."

"क्काय???? पण मग इतके दिवस???"

"तेव्हाच जर ही केस बंद झाली असती तर दुर्गा साठे यांचे कार्य आणि संस्थेची माहिती सर्व न्यूज चॅनलनी कवर केली असती का? शिवाय त्या अजिंक्य राठोड आणि इतर मंडळींच काय?"

"म्हणजे तू मीडियाचा वापर संस्थेच्या प्रचारासाठी आणि त्या भ्रष्ट नेत्यांना शिक्षा देण्यासाठी करून घेतला तर...हॅट्स ऑफ टू यू अँड ऑल नारीशक्ती!!!!"

समाप्त 





Comments

लोकप्रिय

गुप्त समेवर - भाग १

नवदुर्गा- गोष्ट ' ती ' च्या विविध रूपांची- १. देवी शैलपुत्री

नवदुर्गा- गोष्ट ' ती ' च्या विविध रूपांची- २. देवी ब्रम्हचारिणी

गुप्त समेवर- भाग १७

नवदुर्गा- गोष्ट ' ती ' च्या विविध रूपांची -३. देवी चंद्रघंटा