गुप्त समेवर - भाग १८ (अंतिम भाग)
मागील भाग: गुप्त समेवर - भाग १७ गुप्त समेवर - भाग १८ (अंतिम भाग) डोळ्यांवरील चश्मा व्यवस्थित करत घामाघूम झालेला अविनाश आत येत होता , त्याच्या डोक्यावर कॅप नव्हती. रीयाने त्या फोटोतील व्यक्तिला ओळखलं होत...मुग्धाला पण आता अविनाशची खरी ओळख पटली होती , जिवाच्या आकांताने तिने आवाज दिला... “वाचवा मला , सोडवा मला...बाबा SSS ...” अविनाश झपाझप चालत मुग्धाकडे गेला. ते पाहून रीया त्वेषाने बोलली , “खबरदार तू मुग्धाला काही केलस तर , माझे पप्पा तुला सोडणार नाहीत. का बांधुन ठेवलं आहे आम्हाला ? सोड...” रीया बोलत असताना तिचे पप्पा , कमिशनर देशमुख त्या खोलीत आले , रीयाला उद्देशून ते म्हणाले , “आत्ता आली का पप्पाची आठवण ? हे सगळे उपद्व्याप करण्याआधी सांगवस वाटलं नाही ?” “सॉरी पप्पा! इथे अस काही होईल याची कल्पना नव्हती मला. पप्पा प्लीज सोडवा आम्हाला.. हा माणूस खूप डेंजर आहे , याने वसुंधरा मॅडमला पण...” रीया अविनाशकडे पाहून तिच्या पप्पांना सांगू लागली आणि अविनाशच्या मिठीत रडत असलेल्या मुग्धाला पाहताच अवाक झाली … अविनाश मुग्धाच्या डोक्यावरुन अतीव प्रेमाने हात फिरवत ...