Posts

गुप्त समेवर - रहस्यभेद भाग १

(गुप्त समेवर या कथेच्या पहिल्या पर्वात आपण पाहिले कि, मुग्धाला तिच्या भूतकाळाची उकल झाली. तिचे खरे आई वडील क्रांती ( इतिहासतज्ज्ञ) आणि  अविनाश पूर्वाश्रमीचा  यशोधन ( सॉफ्टवेअर इंजिनियर) असून तिच्या आईला म्हणजेच क्रांतीला संशोधनात काही तरी रहस्यमय गोष्टींची उकल झाली होती आणि ती माहिती मिळवण्यासाठी माधव नेने याने १६ वर्षांपूर्वी क्रांतीचा  ॲक्सिडेंट घडवून आणला होता.  इतर पात्रे  मुग्धा उर्फ यशोधरा - शांत , सुंदर , हुशार पण हळवी आपल्या कथेची नायिका. रिया - आर्किओलॉजि ची विद्यार्थिनी आणि  मुग्धाची बेस्ट फ्रेंड  अविनाश उर्फ  यशोधन - मुग्धाचे जन्मदाते वडील आणि क्रांतीचा नवरा क्रांती - मुग्धाची जन्मदाती आई आणि ऐतिहासिक संशोधक  वसुंधरा नेने-   इतिहासतज्ज्ञ आणि मुग्धाच्या कॉलेज मधील प्राध्यापक तसेच कीर्तीची मैत्रीण आणि  माधव नेनेची पत्नी  माधव नेने - वसुंधचा पती आणि ऐतिहासिक वस्तूची तस्करी करणारा. आर्यन - वसुंधरा आणि माधव नेनेचा मुलगा आणि  मुग्धाचा मित्र (अजून तरी )  यशोदा आणि श्रीकांत साठे - मुग्ध...

कुत्र चावल तर...

 आपण मोठे स्वतःला शहाणं समजून लहान मुलांना काही शिकवायला जावं आणि मुलांच्या डोकेबाज पणापुढे निष्प्रभ व्हावं!!! दिसायला इतकुसे असले तरी यांची डोकी खूप भारी आणि विचार एकदम स्पष्ट आणि पक्के असतात. आता म्हणाल, मधूनच अस काय झालं आणि मला ही उपरती झाली. तीच  धमाल सांगायला हा लेखनप्रपंच! हि घटना आहे प्राचीन काळातील म्हणजे कोरोनारूपी राक्षसाच्या आगमनापूर्वीची! जेव्हा सर्व काही सुरळीत चालू होत, घरातील छोटे शैतान खऱ्याखुऱ्या शाळेत जाऊन माझ्या सारख्या बिचाऱ्या आयांना  काही तास मनःशांती द्यायचे. गेले ते दिवस, राहिल्या त्या आठवणी... आता ऑनलाईन शाळेने पालकांची जी काही वाट लावली आहे, असो!( तो एक वेगळाच किस्सा आहे, परत  कधी तरी सविस्तर लिहीन!)  त्याच असं झालं, माझी  कन्याश्री ( जस मातोश्री , पिताश्री यानुसार तिने स्वता:ला कन्याश्री ही पदवी बहाल केली आहे.😃 बरोब्बर ओळखलंत, मागील लॉकडाउन मधील रामायणाचे परिणाम!!) म्हणजे स्पृहा नुकतीच शाळेत जाऊ लागली होती. शाळेत जाणार म्हणून एक आठवडा आधी पोरीने जोमाने सगळी खरेदी केली, त्यापूर्वी आम्ही जवळपास सहा महिने ८-१० शाळा पालथ्या घाल...

जन्म बाबाचा

Image
(सदर लेख  Being Woman Tabloid Newspaper  यामध्ये 16/06/2021 रोजी प्रसिद्ध झालेला आहे.) चंदा ने पूछा  तारों से , तारों ने पूछा हजारोसे , सबसे प्यारा कौन है? पापा  मेरे पापा...                  हे गाणं कानांवर आल्याने  माझी झोपमोड झाली आणि मी डोळे उघडून समोर पाहताच माझी दोन्ही पाखरे हॅपी फादर'स   डे म्हणत मला येऊन बिलगली. बेस्ट स्टुडण्ट ऑफ द इयर, बेस्ट एम्प्लॉयी ऑफ द इयर, इत्यादी इत्यादी किती तरी पुरस्कारांपेक्षा खूप मोठ्ठा पुरस्कार आज मला मिळाला होता. कधी कधी अत्यानंदामुळे डोळयांतून  पाणी येत म्हणतात त्याचा प्रत्यय मला येत होता, नक्की कसं  रिऍक्ट व्हावं तेच कळत  नव्हतं मला ! माझी अवस्था ओळखून माझ्या बायकोने मुलांना बाकीची तयारी करायला बाहेर पिटाळलं आणि मला  चिडवत म्हणाली  " तू करून दाखवलंस...  ATM  machine ते मुलांचा प्रिय बाबा कसा वाटतोय हा बदल?" "खूप म्हणजे खूपच भारी...खरचं गं,  गेल्यावर्षी याच दिवशी आपल्या छोट्याने टीचरना ...

वसुंधरा दिन

     चोहोबाजूंना रंगीबेरंगी फळाफुलांनी लगडलेली  हिरवीगार झाडे, त्या डौलदार झाडांवर चिवचिवणारे चिमणपाखरे, बाजूने खळखळ वाहणारी नदी, स्वच्छ निळेशार आकाश , शुद्ध हवा आणि या आल्हाददायी वातावरणात खेळण्यात दंग असलेले बालगोपाळ... अहाहा किती सुंदर दृश्य!! हि शुद्ध मोकळी हवा, डोळे दिपवणाऱ्या  निसर्गाच्या अनोख्या रंगछटा, चित्त प्रसन्न करणारे झाडे-पक्षी-नदी-हवा यांचे  मंजुळ ध्वनी...  सार काही अत्यंत विलोभनीय आहे.   पण... पण हे काय झालं अचानक? सार काही पुसट  झालं. ...  कुठे आले मी ?           इथे तर मोठमोठ्या इमारती आणि लांबच लांब डांबरी रस्ते दिसताय. एक चिटपाखरू देखील नाही. एकदम गुदमरल्या सारखं का होतंय मला?? किती वेगाने जाताय  सारी वाहने! वाहनांमध्ये बसलेल्या प्रत्येकाच्या पाठीवर टाकी लटकलेली आहे आणि त्यातून निघालेली नळी नाकाला जोडलेली, चेहराच दिसत नाही कुणाचा! अरे हे तर छोटे ऑक्सिजन सिलेंडर आहे. पण माझ्याकडे नाही हे, म्हणून तर ... वाचवा हो कुणी तरी...वाचावा,  माझा श्वा...

नवदुर्गा- गोष्ट ' ती ' च्या विविध रूपांची - ९. देवी सिद्धीदात्री

Image
  मागील भाग वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा    नवदुर्गा- गोष्ट ' ती ' च्या विविध रूपांची - ८.देवी महागौरी ९. देवी सिद्धीदात्री "आज नवरात्रीचा शेवटचा दिवस म्हणजेच नवमी, नवरात्रीत देवीच्या विविध रुपांची मनोभावे आराधना केल्यावर नवव्या दिवशी देवी सिद्धीदात्री या रूपात प्रगटते.  देवी आदिशक्तीची उपासना करून भगवान शकरांनी देवीकडे पूर्णत्वाची मागणी केली. देवीने सिद्धीदात्रीचे रूप धारण करून शंकरांना सर्व सिद्धि प्रदान केल्या आणि शंकरांचे अर्धे शरीर देवीचे झाले.  त्यामुळे भगवान शंकरांना अर्धनारी नटेश्वर हे रूप प्राप्त झाले.  मार्कण्डेय पुराणात   अणिमा, महिमा, गरिमा, लघिमा, प्राप्ति, प्राकाम्य, ईशित्व आणि  वशित्व ह्या आठ सिद्धि तर  ब्रह्मवैवर्तपुराणच्या  श्रीकृष्ण जन्म खंड मध्ये  अठरा सिदधींचा उल्लेख आहे.    नावावरूनच लक्षात येत की सिद्धीदात्री म्हणजेच सिद्धि देणारी. अनेक साधू, ऋषिमुनि सिद्धि मिळवण्यासाठी तप करतात, तप म्हणजे बारा वर्षाचा काळ!  हयातून आपण काय शिकायच??  सिद्धि याचा अर्थ पूर्णत्व, नैपुण्य, कौशल्य असा...

नवदुर्गा- गोष्ट ' ती ' च्या विविध रूपांची - ८.देवी महागौरी

Image
  मागील भाग वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा    नवदुर्गा- गोष्ट ' ती ' च्या विविध रूपांची - ७.देवी कालरात्री ८.देवी महागौरी "नवरात्रीतील अष्टमीच्या दिवशी महागौरीची उपासना करतात.भगवान शंकरांना पती म्हणून प्राप्त करण्यासाठी देवी पार्वतीने अरण्यात हजारो वर्षे उग्र तप केले. अरण्यातील ऊन, वारा पाऊस सहन करून हजारो वर्षे देवीने कडक उपवास केले. देवी पार्वतीन्च्या घोर तप:श्चर्येने शंकर प्रसन्न होऊन विवाहास तयार झाले. त्यांना देवी पार्वती ह्याच पूर्व जन्मीच्या देवी सती आहेत ही ओळख पटली. परंतु उग्र तप, अरण्यातील निवास, कडक उपवास यांमुळे  देवीचे मूळचे तेजस्वी रूप काळवंडले होते, भगवान शंकरांनी  देवी पार्वतींवर त्यांच्या जटेतील गंगेचा जलाभिषेक केला, गंगेच्या पवित्र जलाने देवी पार्वतीचे रूप उजळून निघाले. त्यांच्या या अत्यंत तेजस्वी रूपालाच आपण महागौरी म्हणून ओळखतो.  गौ चा अर्थ आहे ज्ञान, गमन, प्राप्ती आणि मोक्ष तर री म्हणजे देणारी! सामान्यज्ञान तर आपण सगळेच मिळवतो पण शाश्वत निरंतन ज्ञान ग्रहण करणे आवश्यक आहे. गमन म्हणजे गती, आयुष्य नेहमी प्रवाही असावं, थांबला तो संपला...

नवदुर्गा- गोष्ट ' ती ' च्या विविध रूपांची - ७.देवी कालरात्री

Image
मागील भाग वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा    नवदुर्गा- गोष्ट ' ती ' च्या विविध रूपांची - ६.देवी कात्यायनी  ७.देवी कालरात्री "सुप्रभात मंडळी!!!   मी आरजे    चंद्रिका  ,  आपण    ऐकत आहात    मॉर्निंग    मंत्रा शो    आपल्या आवडत्या माय मराठी एफएम वर...नवरात्रीच्या  सर्वांना खूप खूप    शुभेच्छा ,  माय    माऊलीची    कृपा    आपणा सर्वांवर राहो . चला तर मग    सुरू करूया    नवरात्री स्पेशल सेग्मेंट-  ' नवदुर्गा '!!!  आज    नवरात्र सप्तमी  , आज  देवी कालरात्रीची   उपासना केली जाते . अशी  आख्यायिका आहे  की महिषासुराचा  वध  करण्यासाठी  आदिशक्तीने  दुर्गा मातेचे रूप धारण केले. शुंभ निशुंभ , चंड-मुंड  इत्यादि  दैत्यांचा नाश  देवीने लीलया केला, परंतू रक्तबीज या राक्षसाला ठार करताच त्याच रक्त जमिनीवर पडताच त्या प्रत्येक थेंबातून  नवीन असुर जन्म घेई . रक्तबीजाचा  स...