गुप्त समेवर - भाग ६
( गुप्त समेवर - भाग ५ ) ट्रिंग ट्रिंग ... ट्रिंग ट्रिंग ... रियाच्या घरचा लॅंडलाइन वाजत होता … कमिशनर देशमुखांनी तो रेसिव्ह केला , फोनवर त्यांचा पोलिसी कणखर आवाज ऐकून रियाला ओरडण्याच्या तयारीत असलेली स्वरा जरा गडबडून म्हणाली , “ काका , रियाचा फोन स्विच ऑफ येतोय म्हणून तिला सांगायला फोन केला होता की , मी पण पुण्याला जातेय , काल रात्रीच माझ मुग्धाशी बोलणं झाल , आम्ही सगळे सोबतच जाऊ . मी मुग्धाला पीक करून अर्ध्या तासात तिथे येते .” तिच भांबावलेल बोलणं ऐकून जरा हसतच रियाचे पप्पा म्हणाले , “ ok बेटा … मी रियाला तुझा निरोप देतो . आणि हो मी कमिशनर जरी असलो तरी साधा माणूसच आहे हो . इतक घाबरू नको बोलताना .!” “ हो काका .. थोडी गोंधळून गेले मी , पण छान वाटलं तुमचं अस मोकळंपणाने बोलणं ! Bye…” “Bye” इकडे दारासमोर स्वराची गाडी आलेली पाहून , श्रीकांत , यशोदा आणि मुग्धा तिच्या बॅग घेऊन बाहेर ...