नवदुर्गा- गोष्ट ' ती ' च्या विविध रूपांची -३. देवी चंद्रघंटा
नवदुर्गा- गोष्ट ' ती ' च्या विविध रूपांची -२. देवी ब्रम्हचारिणी
३. देवी चंद्रघंटा
“मी आरजे चंद्रिका , आपण ऐकत आहात मॉर्निंग मंत्रा शो आपल्या आवडत्या माय मराठी एफएम वर... चला तर मग सुरू करूया नवरात्री स्पेशल सेग्मेंट- 'नवदुर्गा'!!! आज नवरात्रीचा दूसरा दिवस , या दिवशी देवी चंद्रघं उपासना केली जाते . महिषासुराचा वध करण्यासाठी ब्रम्हा-विष्णु-महेश तसेच इंद्रादी इतर देवतांच्या उर्जेतून देवीच्या अवताराची उत्पत्ति झाली. दहा हातांमध्ये सर्व देवतांची शस्त्रे, गळ्यात भयानक घंटा, कपाळावर घंटाकृती अर्धचंद्रकोर अश्या सिंहारुढ देवी चंद्रघंटेने राक्षसांशी घनघोर युद्ध करून महिषासुराला ठार केले. असे म्हटले जाते की देवी चंद्रघंटेने आकाशातील राक्षसांना ठार मारताच देवीचे वाहन असलेल्या सिंहाने मोठी गर्जना केली,त्यात देवीचा घंटानाद , धनुष्यादी शस्त्रांचा नाद यांच्या आवाजाने दशदिशा गुंजली. त्या भयंकर घंटा नादाच्या तीव्रतेने सार्या राक्षस गटांचा नाश झाला.
आता चंद्रघंटा या नावाचा अर्थ जाणून घेऊ. चंद्र हा आपल्या मनाच्या विविध अवस्था आणि भावनांचे प्रतीक आहे . चंद्राचा आकार जसा रोज बदलत असतो, तसच मनाची अवस्था पण नेहमीच वेगवेगळी असते… कधी परमानंद तर कधी दुख...कधी रागाचा उद्रेक...आपल्याच मनातील राक्षस रूपी विखुरलेल्या विचारांमुळे आपली प्रगती होत नाही. घंटेतून नेहमी एकाच प्रकारचा ध्वनि निर्माण होतो, तुम्ही ती कशीही वाजवा! एकत्रित झालेला तीव्र घंटानाद भयंकर राक्षसाना ठार करू शकतो. अगदी तसच आपल्यातील ऊर्जा आपण एका ठिकाणी केन्द्रित केली, मन एकाग्र केल तर आपली आंतरिक शक्ती जागृत होऊन आपली उन्नती होते...”
“काय भारी माहिती आहे
ही, मला तर माहीतच नव्हतं!”
इंस्पेक्टर सिद्धिसोबत गाडीमध्ये एफएम
वरील मॉर्निंग मंत्रा ऐकत असताना स्वरा उत्स्फूर्तपणे म्हणाली .स्वरा इंस्पेक्टर
सिद्धिची मामेबहिण तर होतीच शिवाय एका प्रसिद्ध न्यूज चॅनलची सीनियर रीपोर्टर होती.
तीस वर्षांची, थोडीशी ठेंगणी परंतु एकदम चुणचुणीत, दिसायला साधारण असली तरी चेर्यावरील आत्मविश्वास आणि टापटीप राहणीमान
यांमुळे उठून दिसणारी , बोलक्या डोळ्यांची आणि सदैव हसतमुख
अशी स्वरा! गेली ६-७ वर्षे ती त्या चॅनल साठी रेपोर्टिंग करत होती. कोणत्याही
बातमीची सत्यता पडताळून योग्य तीच बातमी जगासमोर आणण्याचे अवघड कार्य ती अत्यंत प्रामाणिकपणे करत होती. तिच्या
कामात ती कुठेच तडजोड करायची नाही, तिच्या प्रामाणिक आणि
मुद्देसूद रिपोर्टिंग मुळे तिच्या क्षेत्रात उशिरा का होईना पण आता स्टातचे असे एक
स्थान निर्माण केले होते.
इंस्पेक्टर सिद्धि आज सकाळीच दुर्गा साठे
यांच्या सामाजिक संस्थेमध्ये चौकशी करण्यासाठी घरातून निघाली होती, पण स्वराचा फोन आला आणि तिला केसविषयी काही महत्त्वाचे बोलायचे असल्याने इंस्पेक्टर
सिद्धिने गाडी स्वराच्या घराकडुन घेतली आणि तिला सोबत घेऊन त्या संस्थेकडे निघाली.
आधी तिच्याशी शांततेत बोलून घ्यावे म्हणून सिद्धिने गाडी पार्क केली आणि त्यादोघी
एका कॉफीशॉप मध्ये गेल्या. दोघी कोपर्यातील एका टेबल पकडून बसल्या. इंस्पेक्टर
सिद्धि घाईत असल्याने लगेच मुद्याला हात घालत बोलू लागली,
“हं बोल ग, काय म्हणत होतीस?”
“chillax dear...इतकी उतावीळ काय झालीये, फोनवर पण धड बोलली नाहीस.”
“कस शांत राहू गं? आज तीन दिवस होतील माझ्याकडे केस येऊन. काहीच लिड्स नाही मिळाले अजून!
त्यांच्या माहेरचा काहीच उल्लेख नव्हता म्हणून दोन दिवस माझे सारे संपर्क वापरुन
ती माहिती मिळवली पण व्यर्थ!
“म्हणजे?”
“ काल माझ्या विश्वासू
माणसांकडून दुर्गा साठे यांची लग्नापूर्वीची सारी माहिती मिळाली. दुर्गा साठे यांच्या माहेरच
सध्या कुणीच अस्तीत्वात नाहीये. त्या एकुलत्या एक होत्या, त्यांच्या आईवडिलांचा नैसर्गिक मृत्यू २० वर्षांपूर्वीच झाला. गेल्या तीन
पिढ्या त्यांच्या घराण्यात एकच अपत्य असल्याने त्यांच्या माहेरचे इतर कुणी
नातेवाईक पण नाहीत. दोन दिवसांपासून
चुकीच्या दिशेने तपास सुरू होता माझा.”
“ओके... मी समजू
शकते सध्या खूप दबाव असेल तुझ्यावर. म्हणून टीआर मुद्दाम तुला भेटून ही गोष्ट
सांगावीशी वाटली."
“कोणती गोष्ट??”
“तुला माहिती
असेलच सर्वात आधी आमच्या चॅनलने दुर्गा साठे हरवल्याची बातमी दाखवली होती. मिस्टर
अजय साठेनी ही बातमी गुप्त ठेवली होती तसेच पोलिस डिपार्टमेंट मधून पण कुणीही
बाहेर काही सांगितल नव्हत.”
“बर मग!”
इंस्पेक्टर
सिद्धिला अजून पण स्वराला काय सांगायच आहे ते कळलं नव्हतं. तिचा गोंधलेला चेहरा
पाहून स्वरा बोलू लागली,
“मला त्यादिवशी पहाटेच
एक निनावी फोन आला होता, दुर्गा साठे कालपासून
बेपत्ता झाल्याचा ”
“काय??? कुणी केला होता ते कळलं का?”
“नाही नं...तो नंबर
स्ट्रेस नाही होत.”
विचार करत
सिद्धिने पाण्याचा ग्लास घेऊन पाणी पिऊ लागली, स्वरा
पुढे सांगू लागली,
“मी ती गोष्ट
सोडून दिली होती पण आज सकाळीच पुन्हा फोन आला होता...”
“क्काय
म्हणून??”
हातातील पाण्याचा
ग्लास बाजूला ठेऊन इंस्पेक्टर सिद्धिने आतुरतेने विचारले,
“दुर्गा साठे गायब
होण्यापूर्वी त्यांच्या संस्थेत येऊन गेल्या होत्या,
हे इतक सांगून फोन बंद झाला.”
“पण तुला फोन करून
काय उपयोग?”
“आधीचा फोन आला
होता तेव्हा मला ती व्यक्ति अस म्हणाली की, तुम्ही
योग्य व्यक्ति आहात ही बातमी देण्यासाठी!”
“अच्छा म्हणजे
तुझ्या निरक्षिरविवेक बुद्धीवर त्या अपहरण कर्त्याचा किंवा दुर्गा साठे यांच्या
हितचिंतकाचा विश्वास आहे तर!”
इंस्पेक्टर
सिद्धिच्या बोलण्यावर दोघीही हसल्या. इंस्पेक्टर
सिद्धि घड्याळ पहात म्हणाली,
“खूप चांगलं केल
मला ही गोष्ट सांगून, मी आता त्या संस्थेत जाणार
आहेच तर याचा फायदा होईल. चल निघूया.”
“तू हो म्हणाली तर
ही बातमी मी टेलिकास्ट करण्यासाठी चॅनलकडे देईन.”
“मी आधी चौकशी
करून घेते, मग तू...”
“हम्म म्हणजे माझ्यासारख्या
रीपोर्टर तिथे येऊन तुझ्या चौकशीत व्यत्यय आणणार नाहीत.”
सिद्धिने हसत
स्वराचा निरोप घेतला आणि ती गाडीत बसली. स्वराने रिक्षाला हात केला आणि ती पण निघाली. आता इंस्पेक्टर
सिद्धिला दुर्गा साठेच्या सामाजिक संस्थेमध्ये काही हाती लागत का याचे वेध लागले
होते.
क्रमश:
(कथा कशी वाटली ते कमेन्ट करून जरूर सांगा. याचे पुढील भाग नवरात्रीच्या रोज रात्री 9 वाजता प्रकाशित केले जातील. ही कथा तसेच पुढील सर्व कथा पोस्ट केल्यानंतर लगेच तुम्हाला नोटिफिकेशन मिळण्यासाठी हा ब्लॉग SUBSCIBE करा.)

Comments