गुप्त समेवर - भाग ११



“पाहिल्याच दिवशी शास्त्री सरांनी काय सॉलिड लेक्चर दिल यार! यावर्षी जरा टेंशन कमी असेल अस वाटलं होत, पण या प्रोजेक्ट पायी आपली वाट लागणार आहे.”

समोसा तोंडात टाकत रीया म्हणाली.

“हो न यार! मी तर सुट्ट्या फुल्ल एंजॉय केल्या, प्रोजेक्ट साठी काहीच रिसर्च केला नाही. आता एका महिन्यात आपण कस काय रिसर्च करून प्रोजेक्ट डिसाइड करणार?

      रेहाने रीयाची रि ओढली. आज सुट्ट्या संपून कॉलेज पुन्हा रिओपन झाल, एक लेक्चर करून मुग्धा तिच्या ग्रुपसोबत कॅंटीनमध्ये बसली होती. मुग्धाला सध्या या सगळ्या गप्पांमध्ये अजिबात इंटरेस्ट नव्हता, तीच लक्ष मोबाइल मध्ये होत. गेल्या महिन्यापासून ती आर्यनच्या रीप्लायची वाट पहात होती. त्यादिवशी ब्रेसलेट हरवल्याच लक्षात आल्यावर मुग्धाने आणि रीयाने अख्खा फ्लॅट पिंजून काढला होता. शोधाशोध सुरू असताना आर्यनचा फोन आल्यावर तो पुन्हा फ्लर्ट करतोय अस समजून आधीच वैतागलेल्या मुग्धाने त्याच बोलणं न ऐकताच त्याला झापून फोन कट केला होता. त्यावेळी तिला कसही करून फक्त ते ब्रेसलेट शोधायच होत. ती आणि रीया हॉटेल मध्ये पण जाऊन आल्या. पण ते ब्रेसलेट काही सापडलं नाही. दुसर्‍या दिवशी शांतपणे विचार करत असताना अचानक मुग्धाच्या डोक्यात आल की कदाचित तिने आर्यनला आधारासाठी पकडल त्यावेळी ते बेसलेट त्याच्या शर्टला अडकल असावं! मुग्धाने आर्यनला अनेकदा फोन करून पाहिला पण प्रत्येक वेळी त्याचा फोन आऊट ऑफ कव्हरेज होता. स्वराकडुन समजलं की आर्यन कोणत्या तरी कॅम्पला गेला आहे, तिथे रेंग नसल्याने आता एक महिन्यानेच त्याच्याशी कॉन्टॅक्ट होईल. शेवटी मुग्धाने त्याला एक मेसेज केला call me asap, its urgent!’ आणि अजून ती त्याच्या रीप्लायची वाट पहात होती. अचानक तिचा चेहरा उजळला! Whatsapp वर आर्यनला पाठवलेल्या मेसेजखाली त्याला मेसेज सेंड झाल्याचं दाखवत दोन काळ्या रेषा आल्या होत्या. आता त्या काळ्या रेषा निळ्या कधी होतील याची मुग्धाला ओढ लागली.

      आज पहाटेच कॅम्पवरुन आलेला आर्यन फोन चार्जिंगला लावून मस्त झोपला होता. आल्यावर सगळ्यात आधी त्याने खिशातून ब्रेसलेट काढलं आणि ते डोळे भरून पाहू लागला. त्यादिवशी घरी आल्यावर त्याच्या शर्टला लटकलेल ते ब्रेसलेट दिसल्यावर, ते मुग्धाला परत करण्यासाठीच त्याने मुग्धाला फोन केला होता. त्यावेळी मुग्धा मात्र त्याला नको ते बोलली. तिच्या बोलण्याने प्रचंड दुखावला गेल्याने त्याच रात्री आर्यन कॅम्पच्या बहाण्याने सगळ्यांपासून दूर गेला होता. आर्यन तिथे महिनाभर दर्याखोर्‍यांमध्ये भटकत सगळ्या जगाला विसरला असला तरी, त्याची मुग्धाबद्दलची ओढ अजिबात कमी झाली नव्हती. उलट त्या एकांतात ते ब्रेसलेट नजरेसमोर धरून आर्यन तासन्तास मुग्धाच्या आभासात रमत असे. घरी आल्यावर पण ते ब्रेसलेट पाहतापाहता त्याला कधी झोप लागली ते कळलच नाही.

      आधीच दुरावलेला मुलगा महिन्याभराने घरी परत आल्याने वसुंधराने आज सुट्टी घेतली होती. लहानपणी हॉस्टेलवर ठेवल्याचा राग मनात ठेऊन आर्यन तिच्याशी अजूनही तुसडेपणाने वागत असल्याच तिला समजत होत. त्याची नाराजी दूर करण्याचा ती आटोकाट प्रयत्न करत होती. आज वसुंधराने स्वता: आर्यनला लहानपणी आवडायचा तसा बदामाचा शिरा बनवला आणि तो घेऊन ती त्याच्या रूममध्ये घेऊन आली. वसुंधराने ट्रे बाजूला ठेवला आणि झोपलेल्या आर्यनच्या डोक्यावरुन मायेने हात फिरवून त्याच्या अंगावर पांघरूण घालू लागली, तीच लक्ष आर्यनने हातात पकडलेल्या ब्रेसलेट वर गेल. आर्यनच्या हातून ते काढणार इतक्यात त्याला जाग आली. आर्यनजवळ ते ब्रेसलेट पाहून आश्चर्यचकीत झालेली वसुंधरा त्याला म्हणाली,

“हे ब्रेसलेट तुझ्याकडे... कुणाचं आहे?

“मुग्धाच...”

गडबडून जात, पटकन ते ब्रेसलेट खिशात टाकत आर्यनच्या तोंडून निघाले.

“मुग्धा...स्वराची मैत्रीण! तीच नं?”

वसुंधरेने अजून विषय वाढायला नको म्हणून आर्यन मानेनेच होकार देत म्हणाला

“मॉम तू सकाळी सकाळी इथे?? आज कॉलेज नाही का??”

“तू आजच परत आलास म्हणून सुट्टी घेतली. तुला आवडतो तसा बदामाचा शिरा बनवून आणला आहे.”

ok. मी फ्रेश होऊन खातो.”

      बेडवरून लगबगीने उठत आर्यन म्हणाला. खर तर त्याला खूप आनंद झाला होता, पण स्वता:च्या करियरसाठी आईने आपल्याला दूर ठेवले ही गोष्ट लहनश्या आर्यनच्या मनावर इतकी खोल जखम करून गेली की, आर्यन आजसुद्धा वसुंधरापाशी व्यक्त होत नसे.

“एक मिनिट आर्यन! किती दिवस अस माझ्याशी तोडून वागणार? तुला दूर ठेवताना माझ्या मनाला किती यातना झाल्या असतील, तुला नाही कळणार! माझी बाजू तू कधी समजून घेणार नाहीस का? अस वागण्यामागे माझी पण काही अगतिकता होती आर्यन!”

“कसली कारण? तुझ करियर? पीएचडी? तुझ्या स्वार्थासाठी तू मला आणि डॅडला दूर लोटल. खर तर भारतात परत आल्यावर मी इथे येणारच नव्हतो पण डॅडने समजावल म्हणून तुझ्यासोबत या घरात राहतोय. बिझनेस ट्रीपहून डॅड परत आले की आम्ही दोघे यूकेला जाउ आणि तिथेच सेटल होऊ.

      आज कित्येक वर्षांनी आर्यनच्या मनात साचलेलं विष बाहेर पडलं होत. रागाच्या भरात अजून उलट काही बोलायला नको म्हणून, आर्यन ताडताड पाय आपटत रूमच्या बाहेर पडला. आधी  ते ब्रेसलेट पाहून आणि आता आर्यनच हे बोलणं ऐकून वसुंधराला खूप मोठ्ठा धक्का बसला. वसुंधरा आर्यनच्या रूममधून बाहेर पडणार तेवढ्यात त्याचा फोन वाजू लागला. स्क्रीनवर मुग्धाच नाव बघून वसुंधराने मनाशी काही पक्क ठरवल आणि तडक कॉलेजला गेली. 

    मध्यंतरी रजिस्ट्रार सुट्टीवर असल्याने मुग्धाची फाइल तिला मिळाली नव्हती. आज मात्र एक दोन फोन फिरवल्यावर लगेच एक शिपाई मुग्धाची फाइल घेऊन वसुंधराच्या केबिनमध्ये आला. त्या फाइल मध्ये मुग्धाच मेट्रिक्युलेशन सर्टिफिकेट होत. त्यावरून वसुंधराने मुग्धाच्या मुंबईतील शाळेत संपर्क केला. वसुंधराच्या ओळखींमुळे थोड्याच वेळात मुग्धाच्या शाळेतील अॅडमिशन पेपर्सची स्कॅन केलेली फाइल तिच्या मेल बॉक्स मध्ये आली. ती फाइल बघितल्यानंतर वसुंधरा खुर्चीवर मागे डोके टेकवून, डोळे बंद करून विचार करू लागली. १६ वर्षांपूर्वी नक्की काय झाल असावं हे तिच्या नजरेसमोर स्पष्ट दिसत होत! 

    मुग्धाच्या बाबतीत तिचा तर्क कन्फर्म करण्यासाठी वसुंधराने शारदाश्रम मध्ये फोन केला. परंतू फोनवर वसुंधराला संचालिकांकडून शारदाश्रमच्या नियमांनुसार त्या बोनफाईड वरून मुग्धाची काही माहिती मिळू शकत नाही अस सांगण्यात आल. या गोष्टीचा सोक्षमोक्ष लावण्यासाठी डायरेक्ट मुग्धाशीच बोलायच ठरवून वसुंधरा तिच्या केबीनबाहेर पडली. मुग्धाच्या क्लास्मेट्स कडून ती कॅंटीनमध्ये असल्याच वसुंधराला कळलं आणि तिला भेटायला वसुंधरा कॅंटीनकडे निघाली.   

      आर्यनचा फोन आल्यावर मुग्धाने ते ब्रेसलेट त्याच्याकडेच असल्याच कन्फर्म केल आणि ते घेउन त्याला कॉफीशॉप भेटायला सांगून मुग्धा एकटीच कॅंटीनमधून बाहेर पडली. मुग्धा आणि आर्यनमधील खुलणार्‍या अनोख्या नात्याची रीयाला थोडीफार कल्पना आली होती. त्यादोघांना एकमेकांशी नीट बोलता याव म्हणून जाणीवपूर्वक रीया मुग्धासोबत गेली नाही.

      आर्यनकडे तिच्या भूतकाळातील एक महत्त्वाचा दुवा तर, वसुंधराकडे कदाचित तिचा अख्खा भूतकाळ आता! दोघेही निघालेत मुग्धाला भेटायला. आता मुग्धाची भेट नक्की कुणाशी होईल, हे तर तीच दैवच ठरवेल...    

क्रमश:

गुप्त समेवर - भाग १२


गुप्त समेवर - भाग १०

Comments

Gauri said…
धन्यवाद😊
Unknown said…
Khup late post hot aahe
Gauri said…
It is posted on 17..
Unknown said…
Story write karayla June pasun start kel...End kadhi karnar December madhe• story chaaan aahe pan ti proper time madhe Purana zali.tar ajun chaan..Madam speed have..ek. Engg reader.😊😊
Unknown said…
Ek chaan writer mhanun. Chaan writing skill aahe tumcha. Kade pan late post mule..Reading cha interest jaato.itak ch sangaych
Gauri said…
Ok... Thanks for your inputs...

लोकप्रिय

गुप्त समेवर - भाग १

नवदुर्गा- गोष्ट ' ती ' च्या विविध रूपांची- १. देवी शैलपुत्री

नवदुर्गा- गोष्ट ' ती ' च्या विविध रूपांची- २. देवी ब्रम्हचारिणी

गुप्त समेवर- भाग १७

नवदुर्गा- गोष्ट ' ती ' च्या विविध रूपांची -३. देवी चंद्रघंटा