गुप्त समेवर - भाग ७

    


    माधवगड बंगल्यासमोर गाडी थांबलेली पाहून मुग्धा प्रश्नार्थक नजरेने आर्यनकडे पाहू लागली. तिच्या नजरेतील प्रश्न ओळखून आर्यन बंगल्याकडे बघत म्हणाला,

“हि माझी गरिबाची झोपडी! तुम्ही तिघी मस्त झोपल्या होत्या, तुम्हाला कुठे ड्रॉप करायच मला माहीत नव्हतं, सो मी डायरेक्ट इकडेच गाडी आणली. इथे जरा फ्रेश व्हा, नाश्ता करा मग मी सोडेन तुम्हाला हवं तिथे !”

      आर्यनच्या आग्रहाला मान देत मुग्धा आणि रिया स्वरासोबत माधवगड बंगल्याकडे जायला निघाल्या, आर्यन गाडी पार्क करायला बंगल्याच्या बाजूच्या शेड कडे गाडी घेऊन गेला. बंगल्याच्या समोरील विविध फुलझाडांनी सुशोभित बगीच्यातून बंगल्याकडे जाताना मुग्धाला माधवगड बंगला एखाद्या महालासारखा वाटत होता. पोर्च मध्ये असलेल्या खुर्चीवर पाठमोरी बसलेली बाई पाहून रिया म्हणाली,

“ स्वरा, हि तुझी मावशी का?”

    हो म्हणून स्वरा बंगल्याकडे न जाता मावशीकडे पळत गेली. स्वराच्या मागे निघालेल्या या दोघी मावशीचा चेहरा पाहून जागीच थबकल्या. कॉलेज मध्ये स्ट्रीक्ट म्हणून फेमस असणार्‍या वसुंधरा मॅमना स्वराशी प्रेमाने बोलताना पाहून रिया आणि मुग्धाला खूप नवल वाटलं. इतक्यात स्वरा मावशीसोबत त्यांच्याकडे आली आणि तिने त्यांची ओळख करून दिली. मुग्धाला निरखून पाहत वसुंधरा मॅम म्हणाल्या,

“आय नो रिया व्हेरी वेल, पण कॉलेजमध्ये मुग्धा तू फारशी कुठे दिसली नाहीस. कदाचित इतक्या सगळ्या मुलांमध्ये तुला नीट पहिलं नसेल मी. आज पहिल्यांदाच जवळून भेटत असू आपण. तुझ पूर्ण नाव काय मुग्धा? कुठे राहतेस? तुझ्या आईच नाव काय?

“ हो ना ती कुणाच्या अध्यात मध्यात नसते, तिचे बुक्स आणि स्टडी....” 

      रीयाच अस मध्ये बोलणं वसुंधरा मॅमना खटकलेल लक्षात आल्याने मुग्धाने रियाचा हात पकडून तिला गप्प रहा अस खुणावल आणि ती स्वता: मॅमशी बोलू लागली,

“ माझ नाव मुग्धा श्रीकांत साठे. आईच नाव यशोदा साठे. मी मुंबईची आहे पण सध्या कॉलेजसाठी रीयासोबत पुण्यात  राहतेय. आईबाबा मुंबईलाच असतात.”

      वसुंधरा मॅम स्वता:शीच मुग्धाच आणि तिच्या आई वडिलांचं नाव पुटपुटत विचार करू लागल्या. मॅम त्यांच्याच विचारात हरवलेल्या पाहून मुग्धा आणि रीया तिथून सटकल्या.  स्वराला कसलीशी थाप मारून मुग्धा आणि रीयाने माधवगड बंगल्याच्या आवारातून पळ काढला. नियतीच्या खेळाविषयी अनभिज्ञ अश्या मनुष्याचं बर्‍याचदा असच होत, सहजपणे हाताशी आलेल्या संधीच महत्त्व माहीत नसल्याने ती झिडकारून निघून जातो. मुग्धा आणि रीयाने देखील तेच केल. आज सहजपणे माधवगड बंगल्यात होणारा प्रवेश नाकारलेल्या या दोघींना पुढे जाऊन तिथे जाण्यासाठी किती खटाटोप करावा लागणार आहे याची जरादेखील कल्पना नव्हती!

      इकडे आर्यन गाडी पार्क करून बंगल्याच्या दारात आला, पोर्चमध्ये बसलेल्या स्वराला त्याने विचारले,

“ तू एकटीच? रिया, मुग्धा कुठेय? मॉम नाही भेटली का अजून?”

“ अरे त्या दोघी कोणत तरी अर्जंट काम आहे म्हणून गेल्या आणि मावशी आत गेलीये, मी पप्पांना कॉल केला पोचल्याचा. पण तुला इतका वेळ का लागला स्वता:च्या बंगल्याच्या पार्किंगमध्ये गाडी पार्क करायला? हल्ली पुण्यात गाडी पार्किंगचा प्रॉब्लेम इतका वाढला असेल अस वाटल नव्हतं!”

      स्वराच्या या टोमण्यावर तिला डोक्यावर टपली मारत आर्यन म्हणाला,

“शेडजवळ माळीकाका दिसले, त्यांच्याशी गप्पा मारत होतो. गेटमधून येताना वॉचमन काकानी पण पाहिल ते पण आलेले गाडीच्या मागे, त्यादोघांशी बोलण्यात वेळ गेला. चला आत जाऊया, मासाहेब रागवतील वेळ झाला म्हणून.”

      मुग्धा त्याला न सांगताच गेल्याने जरासं नाराज होऊन आर्यन बंगल्यात जायला निघाला.  आतमध्ये सोफ्यावर बसलेल्या वसुंधराच्या नजरेसमोरून मुग्धाचा चेहरा काही जात नव्हता. काळाच्या ओघात भरत आलेल्या जखमेवरची खपली निघून पुन्हा त्यातून भळाभळा रक्त वहाव अगदी तश्शीच तिच्या मनाची अवस्था झाली होती. मुग्धाचे ते पाणीदार आणि मनाचा ठाव घेणारे डोळे पाहून  आज प्रकर्षाने वसुंधराला तिच्या जिवलग मैत्रिणीची, क्रांतीची आठवण होत होती. आज क्रांतीची मुलगी असती तर ती मुग्धासारखीच दिसली असती...पण कस शक्य आहे हे?? त्या दोघी तर..तेव्हा जर मी क्रांतीच ऐकलं असत तर आज अस माझच मन मला खायला उठल नसत! आत्ता त्या भूतकाळतील चुकांचा पश्चाताप करून काहीच उपयोग नाही हे जाणवल्याने मोठ्या प्रयासाने मनात आलेले विचार वसुंधरेने झटकून टाकले. मुग्धाकडून तीच पूर्ण नाव गाव कळलं असलं तरी पण वसुंधराने पुन्हा एकदा स्वराकडुन तिची सारी माहिती विचारून घेतली होती. तिच्या मनात आलेली शंका चुकीची आहे अस स्वता:शी ठरवून ती सोफ्यावरून उठली. तेवढ्यात आर्यन बंगल्यात आला, खूप  दिवसानी परदेशातून आलेल्या मुलाला पाहून वसुंधरा त्याच्याजवळ जात म्हणाली,

“नेहमीप्रमाणे घरी परत आल्यावर आधी आईला न भेटता इतर सगळ्यांची विचारपूस करून झाली का?”  

वसुंधरेचा डोक्यावरून मायेने फिरणारा हात झटकून देत त्याचे केस नीट करता करता आर्यन म्हणाला,

“आय डोन्ट लाइक धिस मम्मा! आता काय मी लहान नाही. ज्यांनी मला लहान असताना प्रेमाने सांभाळल, वेळ दिला त्यांची विचारपूस तर मी परत आल्यावर करेनच नं!”

      नेहमीसारख तिरकस बोलून आर्यन त्याच्या रूमकडे गेला. त्याच्या पाठमोर्‍या आकृतीकडे पहात वसुंधरेने  डोळ्यात जमा झालेले अश्रु हलक्या हाताने टिपून घेतले आणि स्वराला सोफ्यावर बसवून  काही खायला आणण्यासाठी म्हणून ती किचनमध्ये गेली. आधीच भूतकाळातील चुकांनी व्याकूळ झालेली वसुंधरा आर्यनच्या अश्या वागण्याने आणखीन दुखावली, किचनमध्ये एकांतात अश्रुंना मोकळी वाट करून दिली.

(नक्की काय चूक केली होती वसुंधराने भूतकाळात की त्याचा पश्चाताप तिला अजूनही होतो? मुग्धाशी त्याचा काय संबंध? ही क्रांती कोण? या सगळ्या प्रश्नांची उकल करण्यासाठी वाचत रहा गुप्त समेवर...पुढील भागांचे अपडेट लगेच मिळण्यासाठी ब्लॉग subscribe करा. कमेन्ट आणि लाइक करायला विसरू नका.)  

क्रमश:

गुप्त समेवर - भाग ८

गुप्त समेवर - भाग ६

Comments

Suyog Kulkarni said…
उत्कंठावर्धक
Gauri said…
धन्यवाद
Unknown said…
Mast , interesting story

लोकप्रिय

गुप्त समेवर - भाग १

नवदुर्गा- गोष्ट ' ती ' च्या विविध रूपांची- १. देवी शैलपुत्री

नवदुर्गा- गोष्ट ' ती ' च्या विविध रूपांची- २. देवी ब्रम्हचारिणी

गुप्त समेवर- भाग १७

नवदुर्गा- गोष्ट ' ती ' च्या विविध रूपांची -३. देवी चंद्रघंटा