गुप्त समेवर - भाग ६
ट्रिंग ट्रिंग...ट्रिंग ट्रिंग...
रियाच्या घरचा लॅंडलाइन वाजत होता… कमिशनर देशमुखांनी तो रेसिव्ह केला, फोनवर त्यांचा पोलिसी कणखर आवाज ऐकून रियाला ओरडण्याच्या तयारीत असलेली स्वरा जरा गडबडून म्हणाली,
“ काका, रियाचा फोन स्विच ऑफ येतोय म्हणून तिला सांगायला फोन केला होता की, मी पण पुण्याला जातेय, काल रात्रीच माझ मुग्धाशी बोलणं झाल, आम्ही सगळे सोबतच जाऊ. मी मुग्धाला पीक करून अर्ध्या तासात तिथे येते.”
तिच भांबावलेल बोलणं ऐकून जरा हसतच रियाचे पप्पा म्हणाले,
“ ok बेटा… मी रियाला तुझा निरोप देतो. आणि हो मी कमिशनर जरी असलो तरी साधा माणूसच आहे हो. इतक घाबरू नको बोलताना.!”
“ हो काका.. थोडी गोंधळून गेले मी, पण छान वाटलं तुमचं अस मोकळंपणाने बोलणं! Bye…”
“Bye”
इकडे दारासमोर स्वराची गाडी आलेली पाहून, श्रीकांत, यशोदा आणि मुग्धा तिच्या बॅग घेऊन बाहेर आले. ड्रायवर सीट वरुन उतरून लगबगीने श्रीकांतच्या हातातील बॅग गाडीच्या डिक्कित ठेवणारा आर्यन पाहून मुग्धाच्या कपाळावर आठी उमटली! इतक्यात श्रीकांत आर्यनच्या पाठीवर थाप मारून त्याला काही पैसे देत म्हणाला,
“Thanks young man! पोरींना व्यवस्थित सोड आणि हे पैसे तुला चहा पाण्यासाठी राहू दे.”
श्रीकांत आर्यनला ड्रायवर समजल्याने, त्याचा चेहरा बघण्यासारखा झाला होता.
स्वरा खिदळत म्हणाली,
“बघ Bro… मी तुला म्हणाले होते नं ह्या ड्रेस मध्ये तू ड्रायवरच दिसतोय...अहो काका हा माझा मावस भाऊ, आर्यन आहे.”
“ Ohhh… So Sorry आर्यन! तू इतक्या झटकन बॅग माझ्याकडून घेऊन ठेवल्या की माझा गैरसमज झाला बेटा.” जरासं ओशाळत श्रीकांत म्हणाला.
“ Its ok uncle.. चलता है!” नेहमीच्या स्टाइल मध्ये हसून आर्यनने श्रीकांतशी हात मिळवला.
निघताना श्रीकांत आणि यशोदाने प्रेमाने मुग्धाला मिठीत घेऊन लहान बाळासारखे कुरवाळले आणि भरल्या डोळ्याने तिला निरोप दिला. तिच्या वाट्याला आलेल आईबाबाच ते प्रेम पाहून आर्यनला काही क्षण मुग्धाचा हेवा वाटला. रियाला पीक करून फायनली गाडी मुंबईहून निघाली. आयत्यावेळी आर्यन त्यांच्यात टपकल्याने, रिया आणि मुग्धा जरा नाराज होत्या. पण आर्यनच्या खेळकर आणि विनोदी स्वभावामुळे त्याच्यासोबत थोड्याच वेळात रियाची गट्टी जमली. स्वरा, रिया आणि आर्यन यांच्या फालतू गप्पा आणि विनोद ऐकत मुग्धा पण प्रवास एंजॉय करत होती. मुग्धाला अस एंजॉय करताना पाहून रियाला बर वाटत होत, आणि रीयर व्यू मिरर मधून मुग्धाच हास्य पाहून आर्यन खुश होत होता. मुग्धा गाडीत बसताच आर्यनने मिरर ती दिसेल असा अॅडजस्ट केलेलं मुग्धाच्या लक्षात आल होत.
आर्यनकडे दुर्लक्ष करून मुग्धा फक्त स्वरा आणि रियाशी बोलत होती, तरी पण एखादा चोरटा कटाक्ष त्याच्याकडे टाकताच दोघांची नजरानजर होई आणि गडबडून ते दोघेही दुसरीकडे पहायला लागत. नजरेचा हा लपंडाव मुग्धा आणि आर्यन बराच वेळ खेळत होते. आर्यनने अचानक गाडी थांबवल्याने त्यात खंड पडला.
“काय झाल?” तिघी एकसाथ ओरडल्या.
आर्यन- “पेट्रोल संपलं...”
रिया- “What??? तुला आधी टाकी फूल नाही करता येत का?......”
स्वरा- “Wait..wait!!! ही CNG गाडी आहे न!”
आर्यन- “ Yes my dear sis… मी गाडीच्या नाही माझ्या टाकीतील पेट्रोल बद्दल बोललो. भूक लागली आहे मला, मस्त नाश्ता करूया”
बाजूच्या स्नॅक्स सेंटरकडे बोट दाखवून हसत हसत आर्यन गाडीबाहेर पडला.
“You bitch!!!… उगाच घाबरवतो...”
स्वरा आणि रिया त्याला मारायला त्याच्या मागे पळाल्या. मुग्धा मात्र पुण्याला गेल्यावर शोधाला कुठून सुरवात करावी याचा विचार करत गाडीतच बसून होती. आर्यनने तिच्या बाजूचं दार उघडल्यावर ती तंद्रितून बाहेर आली. एका हाताने दार उघडून कमरेत वाकत दुसर्या हाताने बाहेर उतरण्याचा इशारा करून आर्यन अत्यंत आदबीने मुग्धाला म्हणाला,
“Mam, will you please get down?”
त्याची हे अस सेवकासारख वागणं पाहून, हसू दाबत मुग्धा शांतपणे त्याला म्हणाली,
“नको... मला भूक नाहीये, मी गाडीतच थांबते.”
“ तू नेहमीच असा भाव खातेस की मी दिसल्यावर अस होत? आता पटकन बाहेर ये, वाकल्याने माझी पाठ दुखतेय...”
आर्यन काही ऐकणार नाही म्हणून मुग्धा गाडीतून उतरली. मोकळी हवा लागल्याने तिला छान वाटलं, आजूबाजूचा निसर्ग बघण्यात ती रमली होती. आर्यन मात्र तिलाच बघतोय हे तिच्या गर्ल्स इन्स्टिंक्ट मुळे तिला जाणवत असल तरी त्याच्या नजरेत खटकण्यासारख काहीच नव्हतं! उलट कुठेतरी मुग्धाला पण ते आवडत होत. समोरचा वळण असलेला रस्ता पाहून तिला काही तरी वेगळं जाणवलं चेहर्यावर आलेली बट सावरत मुग्धा म्हणाली,
“आता पुढे घाट सुरू होतो न?”
तिच्या त्या लोभस रूपाकडे पाहण्यात दंग असल्याने आर्यन गोंधळून फक्त “हो” इतकच म्हणू शकला.
“ मी जरा पाय मोकळे करून येते, तुम्ही नाश्ता करून घ्या.”
आर्यनच्या उत्तराची वाट न पाहताच मुग्धा घाटाच्या दिशेने चालू लागली. आर्यनला भूक लागल्याने तो स्नॅक्स सेंटर कडे गेला. आर्यन एकटाच स्नॅक्स सेंटर मध्ये थांबलेला पाहून फ्रेश होऊन आलेल्या रियाने त्याला मुग्धाबद्दल विचारले, ती घाटाकडे गेल्याच समजताच रिया तिथून पळतच बाहेर पडली. आर्यन पण तिच्यामागे पळाला. गोंधलेली स्वरा पण मागे जाणार इतक्यात त्यांनी दिलेली ऑर्डर घेऊन तेथील कामगार आला त्यामुळे तिला तिथेच थांबव लागल.
दरीच्या टोकाशी उभी असलेली मुग्धा दिसताच रियाने तिथे जाऊन मुग्धाला जोरात मागे खेचले आणि घाबरून तिला मिठी मारली. इतका वेळ डोळ्यात जमा झालेले अश्रु आवरणे दोघींना शक्य नव्हते. मुग्धाच्या हुंदक्यांमुळे तीच बोलणं कळत नसल तरी रिया समजून गेली की, मुग्धाला स्वप्नात दिसणारी ती दरी आणि १६ वर्षांपूर्वी झालेल्या अपघाताची जागा हीच असावी. मुग्धाच दु:ख जाणून रिया तिच्या पाठीवरून हात फिरवून तिला शांत करत होती, या सगळ्या प्रकारात आर्यनची मात्र भंबेरी उडाली होती. आपण मुग्धाला एकट सोडलं याच त्याला वाईट वाटल. प्रसंगाच गांभीर्य समजून तो त्यादोघींना सावरायला वेळ मिळावा म्हणून तिथून शांतपणे निघून गाडीत जाऊन बसला. तोपर्यंत स्वरा पण पार्सल घेऊन गाडीत येऊन बसली, तिला झाल्या प्रकाराची काहीच माहिती नसल्याने जरासं रागवत ती म्हणाली,
“ काय रे, तू आणि रिया मला एकटीला सोडून का आलात? तिथे तुमची वाट पाहून शेवटी कंटाळून मी पार्सल घेऊन आले… अरे, पण ह्या दोघी आहेत कुठे?”
झाल्या प्रकाराची ओळख न देता नेहमीसारख हसून आर्यन म्हणाला,
“Both are enjoying nature’s view near valley! चल आपण गाडी घेऊन जाऊया, छान केलस तू पार्सल आणल ते… काय भारी वास येतोय वडापावचा!”
“मला वाटल होत की UK हून आल्यावर तुझ्या सवयी बदलल्या असतील, पण तू होता तसाच आहे! foodmall ला गाडी थांबवायची सोडून तू या वडापाव वाल्याकडे आणल.”
स्वरा अस म्हणत असतानाच मुग्धा आणि रिया गाडीत येऊन बसल्या. स्वरा त्यांना काही विचारणार इतक्यात तिच्या तोंडात वडापाव कोंबत आर्यन म्हणाला,
“या वडापावची मजा त्या बर्गर मध्ये नाही माय डियर! बघ काय भन्नाट चव आहे. झाल वाटत यांचं साइट सीइंग, आता हे खाऊन घ्या मॅडम?”
आर्यनने रियाला डोळा मारत खुणावले आणि तिला वडापाव दिला. त्याने एकदम खुबीने विषय बदलला होता, हे रिया आणि मुग्धाला कळाले. त्याच्या नजरेत दिसणारी मुग्धाची काळजी आणि तिला सावरून घेण्याचा धडपड पाहून रियाला खूप बर वाटलं. रिया पण त्याला हसून म्हणाली,
“जगात भारी, वडापाव! तुझ अस मातीशी जोडलेल असण आवडलं आपल्याला.”
स्वरा-“अग, त्याने फक्त अंकलच्या सांगण्यावरून UK ला जाऊन MBA केल, नाही तर तुमच्यासारखं Archaeology करण्याचाच विचार होता याचा. हो न bro?
आर्यन-“Yes… आपली संस्कृती आणि इतिहास यांचा प्रचंड अभिमान आहे आपल्याला.”
मुग्धा- “Strange…तुझ्यासारखा या काळातला मुलगा वडिलांच्या सांगण्यावरून त्याच करियर चेंज करतो म्हणजे...”
घाटातल्या प्रसंगानंतर शून्यात हरवलेली मुग्धा पहिल्यांदाच त्याच्याशी बोलल्याने आर्यनला आनंद झाला. तो म्हणाला,
“त्यात काय Strange? डॅडचा बिझनेस पुढे जाऊन मलाच सांभाळायचा असल्याने जन्मत: माझ करियर फिक्स होत, त्यासाठी मी MBA केल. But History is my passion आणि ते मी जन्मभर फॉलो करेनेच! आत्तापर्यंत भारतातील निम्म्या ऐतिहासिक ठिकाणांना भेटी देऊन त्यांचा सखोल अभ्यास केला आहे मी.”
आर्यन इतका विचारी असेल अस मुग्धाला वाटलं नव्हतं. आतून शांत, समंजस असला तरी स्वता:च्या आयुष्यातील दु:ख लपवण्यासाठी आर्यनने असा खेळकर आणि हुडपणाचा मुखवटा घातला असावा, अस मुग्धाला उगाच वाटून गेल.
काही वेळ अशाच गप्पा सुरू होत्या, नाश्ता झाल्याने थोड्या वेळातच तिघींचे पण डोळे लागले. आर्यन मात्र गाणी ऐकत, त्यासोबत शिळ घालत गुणगुणत, मध्येच आरश्यातून दिसणार्या झोपलेल्या निरागस मुग्धाला डोळ्यात साठवत गाडी चालवत होता. असा बराच वेळ गेला आणि अचानक ब्रेक लागून गाडी थांबल्याने तिघी पण खडबडून जाग्या झाल्या. बाजूच्या काचेतून बाहेर डोकावल्यावर मुग्धाला दिसला दिमाखात उभा माधवगड बंगला!
( मुग्धाची गाडी माधवगड बंगल्यासमोरच थांबल्याच कारण, तिचा बंगल्यात प्रवेश होईल की अजून काही नव संकट तिच्या समोर उभ ठाकेल? जाणून घ्या पुढील भागात.)
क्रमश:..
गुप्त समेवर - भाग ७

Comments