नवदुर्गा- गोष्ट ' ती ' च्या विविध रूपांची - ७.देवी कालरात्री

मागील भाग वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा  

नवदुर्गा- गोष्ट ' ती ' च्या विविध रूपांची - ६.देवी कात्यायनी

 ७.देवी कालरात्री

"सुप्रभात मंडळी!!!

 मी आरजे  चंद्रिका आपण  ऐकत आहात  मॉर्निंग  मंत्रा शो  आपल्या आवडत्या माय मराठी एफएम वर...नवरात्रीच्या सर्वांना खूप खूप  शुभेच्छामाय  माऊलीची  कृपा  आपणा सर्वांवर राहो . चला तर मग  सुरू करूया  नवरात्री स्पेशल सेग्मेंट- 'नवदुर्गा'!!! आज  नवरात्र सप्तमी , आज देवी कालरात्रीची उपासना केली जाते . अशी  आख्यायिका आहे  की महिषासुराचा  वध  करण्यासाठी  आदिशक्तीने  दुर्गा मातेचे रूप धारण केले. शुंभ निशुंभ , चंड-मुंड  इत्यादि  दैत्यांचा नाश  देवीने लीलया केला, परंतू रक्तबीज या राक्षसाला ठार करताच त्याच रक्त जमिनीवर पडताच त्या प्रत्येक थेंबातून  नवीन असुर जन्म घेई . रक्तबीजाचा  समूळ नायनाट करण्यासाठी  दुर्गा  मातेने  तिच्या तेजातून  माता कालरात्रीला  उत्पन्न केले. दुर्गा मातेने रक्तबिजाव्हीआर वार करताच रौद्ररूपी  कालरात्री मातेने त्याचे रक्त  जमिनीवर  सांडू न देता ते स्वतच्या मुखाने  प्राशन केले आणि अश्या प्रकारे रक्तबीज राक्षसाचा अंत झाला. भक्तांना शुभफळ देणारी असल्याने देवीच्या या रूपाला  शुभंकरी असेही म्हणतात.
आता जाणूया कालरात्री या नावातील अर्थ! सर्व सूक्ष्म गोष्टींचे आकलन रात्रीच्या वेळीच होते, जस की दिवसा आपल्याला अवकाशातील फक्त सूर्य हाच तारा दिसतो परंतू रात्रीच्या अंधारात असंख्य तारकांचे दर्शन होते. तसेच रात्र ही शारीरिक आणि मानसिक  शांतता आणि विश्रांति देणारी असते. काल किंवा काळ याचे तीन अर्थ आहेत,-१. वेळ, २. मृत्यू- विनाश, ३.काळा रंग! सर्व नकारात्मक विचारांचा- गोष्टींचा विनाश करण्याची शक्ती आपल्यातच असून, वेळ पडल्यास ती जागृत करून पुन:श्च सर्वत्र शांतता- मांगल्य प्रस्थापित करण्याचा संदेश ही कालरात्री माता अनंत काळापासून (कालसापेक्ष) देत आहे. जय कालरात्री माते!!!"

 

आज इंस्पेक्टर सिद्धि प्रचंड खुश होती, कालच तिने स्वता: स्वराच्या मदतीने न्यूज चॅनलकडे खासदार अजिंक्य राठोड आणि अनेक राजकीय नेत्यांच्या गैर कारभारांची माहिती दिली होती. 
खासदार अजिंक्य राठोड यानेच साठे उद्योग समूहाला नेस्त नाबूत करण्यासाठी दोन वर्षांपासून प्रयत्न केले असल्याचे लक्षात येताच इंस्पेक्टर सिद्धिने त्याची कसून माहिती काढायला सुरुवात केली. अजिंक्य राठोड याच्यामार्फत होणारी अमली पदार्थांची विक्री  तसेच माफियाशी असणारे संबंध पुराव्यानिशी तिने शोधून काढले होते.     

 अजिंक्य राठोड सोबत अनेक नेत्यांच्या गैर कारभारांची माहिती इंस्पेक्टर सिद्धिने खणून काढली आणि माध्यमांनी सामान्य जनतेपर्यन्त  या पुढार्‍यांचे अनेक प्रताप पुराव्यानिशी पोहोचले होते. एका रात्रीत हे सारे प्रकरण दिल्लीपर्यन्त पोहोचले,  पक्षाची इभ्रत वाचवण्यासाठी पक्षाध्यक्षांनी सर्व भ्रष्ट नेत्यांना राजीनामे देण्यास सांगितले. आज सकाळी सकाळी डायरेक्ट सीएम ऑफिस मधून सर्व भ्रष्ट मंत्र्यांना अटक करण्याचे आदेश देण्यात आले होते. काल रात्रीच इंस्पेक्टर सिद्धिने अनेक ठिकाणी छापे मारून अनेक गैर उद्योगांना कायमचे टाळे लावले आणि या सर्वांचा तारणहार असणार्‍या माफिया डॉनला त्याच्या अड्ड्यावर जाऊन जागीच गोळी घालून ठार केले होते. त्यामुळे आता ह्या भ्रष्ट नेत्यांना कुणीच वाली उरला नव्हता आणि त्यांच्याविरोधात साक्ष द्यायला कुणाला भीती पण नव्हती.    

  गेल्या दोन दिवसांपासून अजिंक्य राठोडच्या पाळतीवर इंस्पेक्टर सिद्धिची खास माणसे होती.  माफिया डॉन चे एंकाऊंटर झाल्याचे कळताच अजिंक्य राठोड पळून जाण्याची तयारी करू लागला. तो  निसटण्या आधीच  इंस्पेक्टर सिद्धि त्याच्या ठिकाणावर  पोहोचली आणि त्याच्या मुसक्या आवळून त्याला गजा आड केले. दिवसभर मोठ्या शौर्याने इंस्पेक्टर  सिद्धि आणि इतर पोलिस फौजेने अनैतिक उद्योग धंदे असणार्‍या सर्व नेत्यांना  गजा आड केले, त्यांच्याशी निगडीत गुंडांना यमसदनी धाडले. सगळ्या न्यूज चॅनल वर इंस्पेक्टर सिद्धि आणि तिच्या सहकार्‍यांचे कौतुक होत होते.

 गेल्या चार आठ दिवसांच्या अथक परिश्रमा नंतर  इंस्पेक्टर सिद्धि आज कमिशनर ऑफिस मध्ये बसून शांततेत चहा घेत होती. इतक्यात कमिशनर सर आल्याने इंस्पेक्टर सिद्धि  चहा बाजूला ठेऊन उठली, ते पाहून कमिशनर म्हणाले,

"सीट इंस्पेक्टर, इतका मोठा  पराक्रम गाजवल्याने तुझे करावे तेव्हढे कौतुक कमीच आहे. आय एएम प्राउड ऑफ यू इंस्पेक्टर! थोड्याच वेळात आपली प्रेस कॉन्फरन्स होईल तेव्हा..."

"एक्सक्यूज मी सर... प्रेस वाल्यांशी आपण उद्या बोलूया का?" 

"का पण??? यू डन व्हेरी गुड जॉब!!! भल्या भाल्यांना नाही जमल ते तू करून दाखवल आहेस. सगळ्यांसमोर येऊन तुझ कौतुक झालच पाहिजे. अनेक प्रश्न असतील लोकांपुढे त्याची उत्तर देण आपली जबाबदारी आहे."

" यस सर...तुम्ही म्हणता ते योग्य आहे पण मी माझी केस अजून पुर्णपणे सोडवली नाही, अजून पण दुर्गा साठे सापडल्या नाहीत आणि हा सगळा पराक्रमा मी एकटीने नाही केला. म्हणून मला अजून एक दिवसाची मुदत द्या, मी ही केस सोडवल्यावरच प्रेस समोर येईन...प्लीज सर!"

"ओके... यू आर राइट... पण उद्यापर्यन्त  श्रीमती साठे नक्की सापडतील??"

"यस सर...कॅन आय गो नाऊ?? "

इंस्पेक्टर सिद्धिच्या डोळ्यात एक वेगळीच चमक दिसत होती. 

क्रमश:

पुढील भाग वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

नवदुर्गा- गोष्ट ' ती ' च्या विविध रूपांची - ८.देवी महागौरी


 



 

 

 

Comments

Gauri said…
धन्यवाद काका

लोकप्रिय

गुप्त समेवर - भाग १

नवदुर्गा- गोष्ट ' ती ' च्या विविध रूपांची- १. देवी शैलपुत्री

नवदुर्गा- गोष्ट ' ती ' च्या विविध रूपांची- २. देवी ब्रम्हचारिणी

गुप्त समेवर- भाग १७

नवदुर्गा- गोष्ट ' ती ' च्या विविध रूपांची -३. देवी चंद्रघंटा