गुप्त समेवर - भाग १४
वसुंधरा मॅम दिल्लीहून परत
आल्या तरी मुग्धाशी त्यांची भेट किंवा बोलणं झालच नाही. बर्याचदा फोन करून पण एकदाही त्या मुग्धाशी बोलल्या नाहीत. हल्ली कॉलेजमध्ये
पण फार क्वचित दिसायच्या. वसुंधरा मॅम सध्या सेमिनार, यूनिवर्सिटी
मिटींग, नॅशनल कॉन्फरन्स अश्या अनेक गोष्टींमध्ये व्यस्त
असल्याच तिला कॉलेज मध्ये इतर स्टाफ कडून समजायच. तिने एकदा आर्यनला फोन करून
मॅमला भेटता येईल का ते विचारले होते, पण त्याने तो सध्या
डॅडसोबत ऑफिस मध्ये बिझी असून मॅम त्यालाच एक आठवडा भेटल्या नसल्याच सांगितलं. असही
आर्यन आणि वसुंधरा मॅमच विशेष बॉंडिंग नाहीये हे मुग्धाला समजत होत. मुग्धाला कधी
एकदा मॅमला भेटून त्या ब्रेसलेट मधील कोड्याच उत्तर सांगत्ये आणि त्याचा तिच्या
भूतकाळाशी असलेला संबंध त्यांना विचारते आस झाल होत. तिच्या भूतकाळाविषयी वसुंधरा
मॅमना सगळी माहिती असावी अशी तिची अटकळ होती.
आज मात्र नियतीने स्वत:हून मुग्धा आणि वसुंधराची भेट घालायचं
ठरवलं होत. वसुंधरा नेने पीजी स्टुडन्ट चे प्रोजेक्ट सब्जेक्ट अप्रूव्ह करणार
होत्या, रोल नंबरनुसार दिलेल्या टाइम स्लॉट मध्ये एकेक स्टुडन्ट वसुंधरा नेनेंच्या केबिनमध्ये जात होता.
मुग्धाचा नंबर आल्यावर ती तिची प्रोजेक्ट अॅबस्ट्रॅक्ट ची फाइल घेऊन वसुंधरा
मॅमच्या केबिन मध्ये गेली. मुग्धाकडे बघायच टाळून मॅम तिची फाइल पाहू लागल्या.
त्यांनी एकदा चमकून मुग्धाकडे पाहिलं,
प्रोजेक्ट नेम मोठयाने वाचून त्या बोलू लागल्या,
“THE KAILASA – Chronology And Development, What is the importance of this project?”
“I got this clue from the bracelet!...Mam please…”
मुग्धाच पुढचं काही ऐकून न
घेता वसुंधराने तिच्या फाइलवर ‘Rejected’ असा शेरा मारून ती
फाइल डस्टबिन जवळ टाकली, मुग्धाला बाहेर जायला सांगून
नेक्स्ट असा आवाज दिला. दूसरा स्टुडंट केबिनमध्ये आल्याने
मुग्धा काही न बोलता भरल्या डोळ्यांनी केबिन बाहेर आली. तिचा प्रोजेक्ट रीजेक्ट
केल्यामुळे रडत असावी अस वाटून तीच्या मैत्रिणी तिला समजाऊ लागल्या, पण रीयाला तिच्या रडण्याच खर कारण समजलं होत. ती मॅमला जाब विचारायला
रागात निघाली पण होती, मुग्धाने तिला हात पकडून थांबवलं आणि
दोघी कॉलेज बाहेर पडल्या.
बाकीच्या मुलांना उद्या यायला सांगून वसुंधरा तिच्या केबिन मध्ये
शांत बसून विचार करू लागली. गेला महिनाभर तिने किती खटाटोप केले, याची तिला आठवण झाली. त्यादिवशी कॉफीशॉपमध्ये मुग्धाला भेटण्यापूर्वी
तिला जी भीती वाटत होती ती सत्यात उतरली होती. दिल्लीला विमानातून उतरल्यावर तिने
मोबाइल ऑन केला तेव्हा त्यावर २-४ मेसेज आले होते, त्यापैकि
एक मेसेज वाचून तिच्या कपाळावर अठी उमटली. इतक्यात एका अनोळखी नंबरवरुन तिला फोन
आला, वसुंधराने तो घेताच पलीकडून एक अनोळखी व्यक्ति बोलू
लागली,
“बंद कर तुझ हे ऐतिहासिक
संशोधन! १६ वर्षांपूर्वी झाल ते कमी होत का? आता पुन्हा
मेलेले मुडदे उखडू नकोस, परिणाम वाईट होतील!”
“मी कोणत्याच परिणामांना
घाबरत नाही. सगळ्या गोष्टींचा हिशोब चुकता करेन...”
तीच बोलणं न ऐकताच पलीकडून अविनाशने फोन कट केला होता. तो नंबर
ट्रेस करून काही मिळणार नाही हे वसुंधराला माहिती होत. तिने तिच्या घरच्या
लँडलाइनवर कॉल केला, घरकाम करणार्या शांताक्काने
वसुंधराला थोड्या वेळापूर्वी माधवसाहेब बिसनेस ट्रीपहुन घरी परत आल्याच सांगितलं.
आर्यनने मागे सांगितल्याप्रमाणे माधव परत आल्यावर ते दोघे लवकरच यूके ला शिफ्ट
होतील याची तिला धास्ती वाटू लागली. लवकरात लवकर हालचाली करून १६ वर्षांपूर्वी
झालेल्या घडामोडी पुराव्यानिशी जगासमोर आणणे आता वसुंधरासाठी गरजेचे होते. त्यासाठी
तिने पूर्ण महिनाभर त्या माणसाविरोधात अनेक पुरावे गोळा केले. त्या माणसाचा क्रूर स्वभाव माहीत असल्याने तिने मुग्धापासून लांब राहायचे
ठरवले होते, तिला या कशाली झळ पोचू नये म्हणून ती मुग्धाचे
फोन घेण किंवा तिला भेटणं टाळत होती. वसुंधराला आज प्रकर्षाने क्रांतीची आठवण झाली, त्या राक्षसी माणसाने क्रांतीला कस क्रूरपणे मारून टाकलं हे आठवल्याने
भीतीची लाट तिच्या मनात उसळली. इतक्यात तिचा फोन वाजला,
स्क्रीनवर आर्यनच नाव पाहून वसुंधराने उत्सुकतेने फोन घेतला,
“हॅलो बेटा!”
“आज संध्याकाळी हॉटेल
ग्रँड पॅलेस मध्ये तुझा सक्सेस सेलिब्रेशनसाठी पार्टी ठेवली आहे. प्लीज कम ऑन
टाइम.”
“थॅंक यू आर्यु...”
आर्यनने तिच्यासाठी पार्टी
ठेवली हे ऐकून तिला खूप आनंद झाला. पण एका क्षणात आर्यनच्या बोलण्याने त्या
आनंदावर विरजण पडलं,
“मी फक्त डॅडने सांगितलं
म्हणून ठेवली ही पार्टी. सो थॅंक टु हिम नॉट मी!”
डोळ्यातील पाणी पुसत
वसुंधरा अनावधाने बोलून गेली.
“आज सत्य समोर आल्यावर
तुझा सगळा रुसवा संपेल आणि माझा आर्यु आधीसारख माझ्याशी प्रेमाने बोलेले.”
“मला नाही समजत अस कोणत
सत्य आहे ते, डॅड वाट पहात आहे मी जातो. बाय.”
वसुंधराला आज त्या माणसाविरोधात एक ठोस पुरावा मिळणार होता, आत्ता आर्यनने पार्टी ठेवल्याने तिकडे जाण आवश्यक होत. कुठे तरी पाणी मुरतय हे तिच्या लक्षात आल. थोडा फार
विचार करून डस्टबिन जवळ पडलेली मुग्धाची फाइल वसुंधरणे उचलली. फाइल चेक करून साइन
केली. एका शिपायाकडे ती फाइल मुग्धाला तिच्या क्लास मध्ये नेऊन द्यायला सांगून
वसुंधरा केबिन लॉक करून निघाली. माधव गड बंगल्यावर आली तेव्हा बंगल्यात फक्त
शांताक्का होती. तिच्याशी थोड फार बोलून शांताक्कावर एक महत्त्वाची कामगिरी तिने
सोपवली आणि तयारी करून पार्टीसाठी निघाली. साऊथ कॉटन सिल्क साडी, गळ्यात एक मोत्याची सर आणि त्याला शोभतील अश्या कानातल्या कुड्या, पाठीवर रूळणारी वेणी अश्या सध्या पोषाखात पण डोळ्यातील आत्मविश्वासने
जात्याच सुंदर असणारी वसुंधरा उठून दिसत होती. तिच्या पाठमोर्या रूपाकडे पाहून
शांताक्काने बोट मोडून तिची नजर काढली आणि देवघराकडे गेली. देवासमोर
हात जोडून शांताक्काने देवाला विनवल,
“आता तरी या पोरीच्या
मागची पीडा संपू दे, तिच्या मनासारखं होऊ दे रे बाबा.!”
देवासमोरचा दिवा विझल्याच शांताक्काने पाहिलं. हा वाईट शकुन ओळखून
म्हातारी शांताक्का वसुंधराला थांबवाव म्हणून पळतच बाहेर आली, पण तोपर्यंत वसुंधरा निघून गेली होती. म्हातारीच्या जीवाला घोर लागून
राहिला. पुन्हा देवघरात जाऊन पोरीला सुखरूप ठेव म्हणून ती
देवाला विनवू लागली. पार्टीच्या ठिकाणी पोचल्यावर माधव नेने म्हणजे वसुंधराच्या
नवर्याने तिला भारत सरकारचा पुरस्कार मिळाल्याबद्दल सगळ्यांसमोर वसुंधराचे खूप
कौतुक केले. आर्यनने सगळ्या मित्रांसोबत मुग्धा आणि रीयाला
पण बोलावले होते. सगळे पार्टी एंजॉय करत असताना वसुंधरा तिथून हळूच हॉटेलच्या लॉबीमधून
बाहेर पडून थोडसं अडोश्याला गेली. बराच वेळ वाजणारा फोन तिला
आजूबाजूच्या गर्दीमुळे घेता आला नव्हता. हॉटेलची मागील बाजू
असल्याने तिथे फारसा उजेड नव्हता. फोन लावण्याच्या तयारीत
असलेल्या वसुंधराच्या दंडाला पकडून कुणी तरी जोराने तिला मागे खेचले. अंधारात त्या माणसाचा चेहरा दिसत नसला तरी त्याला वसुंधराने ओळखले होते, वसुंधरा उसळून म्हणाली,
“काय प्रकार आहे हा? सोड मला?”
“तू आधी सांग काय सुरू आहे
तुझ? कसल सत्य संशोधन करते आहेस? तुझ्या त्या मैत्रिणीचे
काय हाल झाले ते विसरली का?”
“काहीच विसरले नाही मी! त्या सगळ्याचा हिशोब चुकता करेन आता! तुझा राक्षसी चेहरा या जगासमोर आणेन
मी, सोड मला.”
वसुंधराच्या डोळ्यात अंगार फुलला होता. इतके दिवस त्यामध्ये
दिसणारी भीती आज नाहीशी झाली होती. तिचा निर्धार
पाहून एक क्षण त्या माणसाची पकड जरा सैल झाली, संधीचा फायदा
घेत वसुंधराने त्या राक्षसाला जोरात ढकलले आणि तिथून निसटली. पुन्हा पार्टीच्या
ठिकाणी आल्यावर तिला हायस वाटलं पण त्या झटपटीत तिचा मोबाइल तिकडेच पडल्याच तिच्या
लक्षात आल. एका वेटरला बोलावून तिने तिचा मोबाइल हॉटेलच्या मागच्या बाजूला शोधायला
पाठवल. थोडसं नॉर्मल होत ती पुन्हा सगळ्यांमध्ये मिसळली. आर्यन रिया आणि मुग्धसोबत गप्पा मारत होता, वसुंधरा त्याच्याजवळ गेली. त्याला प्रेमाने जवळ घेत वसुंधरा म्हणाली,
“थॅंक यू आर्यु...खूप छान
केली आहे पार्टी!”
आज खूप वर्षानी वसुंधराच्या कुशीत शिरलेला आर्यन जरा सुखावला. पण
स्वता:ला सावरत तो बाजूला होत तो लगेच म्हणाला,
“इट्स ओके मॉम! यू डिसर्व it!”
आर्यनच्या बाजूला उभ्या मुग्धाला पण वसुंधराने प्रेमभराने मिठीत
घेतले आणि तिच्या पाठीवर थापतून तिला म्हणाली,
“योग्य मार्गावर आहे तू.
तुझा प्रोजेक्टला मान्यता दिली आहे मी, किसनकडे दिलेली
फाइल मिळाली न?”
मुग्धा काही उत्तर देणार इतक्यात माधव नेनेंनी आवाज दिल्याने वसुंधरा
तिकडे गेली. मुग्धा आणि रीयाला वसुंधराच बोलणं ऐकून खूप आनंद झाला. त्या दोघी आता छान
मूड मध्ये पार्टी एंजॉय करू लागल्या. आर्यनच लक्ष मात्र वसुंधरा आणि माधव असलेल्या
ग्रुपकडे होत. आज बर्याच वर्षानी त्याला त्याचे आईवडील असे एकत्र हसताना दिसत होते, ते पाहून तो मनोमन सुखावला. त्याच्याही नकळत त्याच्या ओठांवर हसू फुलले. आर्यनला
अस स्माइल करताना पाहून मुग्धा तो पहात असलेल्या दिशेने पाहू लागली. तिला वसुंधरा मॅमच्या
मागील घोळक्यात असणारा अविकाका दिसला. त्याला तिथे पाहून मुग्धाला खूप आश्चर्य वाटलं.
त्याच्याशी बोलावं म्हणून मुग्धा जाऊ लागली, इतक्यात कुठे निघाली
म्हणत आर्यनने तिचा हात पकडला. दोघेही एकमेकांच्या स्पर्शाने हरखून गेले. रीयाने खाकरल्यासारख
केल्याने दोघे भानावर आले, मुग्धाने पटकन आर्यनच्या हातातील हात
सोडवून घेतला. त्या दोघांना अस भांबावलेल बघून रीया हसत सुटली. तेवढ्यात त्यांच्या
कानावर एक जोरदार किंकाळी आली,
“वसूsss”
तिघांनी समोर पाहिल, इतका वेळ गप्पा गोष्टी करणारी लोक शांत झाली होती आणि मोठा घोळका जमा झाला
होता. त्यातून वाट काढत आर्यन मध्यभागी पोहोचला, समोरील दृश्य पाहून त्याच सार अवसान गळल! जमिनीवर वसुंधरा निपचीत पडलेली होती, तिचा चेहरा वाकडा झाला होता आणि डोळे सताड उघडे होते. तिच्या हातातील ग्लास
फुटून त्याच्या काचा विखुरल्या होत्या. आर्यनचे डॅड काकुळतीला
येऊन वसुंधराला शुद्धीवर आणायचा प्रयत्न करत होते. तिथे आलेल्या पाहुण्यांपैकी एक डॉक्टर
असलेले गृहस्थ पुढे आले त्यांनी आर्यनला अॅम्ब्युलन्स बोलायला सांगितली आणि खाली बसून
ते वसुंधराला चेक करू लागले. अत्यंत खेदपूर्ण स्वरात ते डॉक्टर म्हणाले,
“सॉरी आता अॅम्ब्युलन्स येऊन
पण काहीच उपयोग होणार नाही. She is no more...this is might be due to severe heart attack!”
तिथे जमलेले सगळे जण वसुंधरा अस अचानक जाण्याने हळहळ व्यक्त करत होते. एक व्यक्ती मात्र मनातून खूप खुश झाली होती. आज पर्यंत जे कोणी त्याच्या मार्गात आले त्याचा काटा असच अलगद पणे त्याने काढला होता.
क्रमश:

Comments